Join us

Sridevi Death Anniversary: जान्हवी कपूरचा हा फोटो तुम्हालाही ‘चांदनी’ची आठवण करुन देईल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 12:30 PM

Sridevi Death Anniversaryजान्हवीची ही अदा श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यातील अशाच मिळत्याजुळत्या हळुवार क्षणाची आठवण करुन देणारी होती.  

बॉलीवुडची चांदनी 14 फेब्रुवारी 2018 ला जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण देश हादरला होता. यावेळी श्रीदेवी एका नातेवाईकाच्या लग्नासाठी दुबईला गेल्या होत्या. तिथेच एका हॉटेलमध्ये त्यांचं निधन झालं होतं.मात्र, त्यांच्या आठवणी आजही चाहते आणि बॉलिवूड कलाकारांच्या मनामध्ये ताज्या आहेत. 

श्रीदेवी आणि त्यांची लेक जान्हवी कपूर यांच्यातील नातं हे कोणत्याही मायलेकीप्रमाणेच होतं. दोघींचा एकमेकींवर खूप जीव होता. जान्हवीच्या बालपणापासूनच्या गोष्टी ते बॉलीवुडमध्ये पाऊल ठेवण्याच्या निर्णयात श्रीदेवी यांचा सिंहाचा वाटा होता. पापा बोनी कपूर यांच्यापेक्षा जान्हवीचे आपल्या आईशी जास्त ट्युनिंग होतं. 

श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण कपूर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. श्रीदेवी यांच्या निधनानंतर पापा बोनी कपूर यांचा जान्हवीच आधार बनली होती. श्रीदेवी यांच्या निधनाने त्यांना मोठा धक्का लागला होता. अशावेळी जान्हवीच आपल्या वडिलांना या धक्क्यातून बाहेर पडावं यासाठी प्रयत्न केले होते. श्रीदेवी यांची बोनी कपूर यांना कमी जाणवू नये याचा ती प्रयत्न करताना दिसली.

 

याचीच प्रचिती ६५व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात आली होती. याच सोहळ्यात जान्हवी श्रीदेवी यांच्याप्रमाणे आपल्या वडिलांची काळजी घेत असल्याचा एक फोटो समोर आला होता.  या फोटोत जान्हवी आपल्या जवळ असणाऱ्या रुमालाने वडिलांच्या डोक्यावरील घाम पुसत असल्याचे पाहायला मिळाले. 

 

जान्हवीची ही अदा श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यातील अशाच मिळत्याजुळत्या हळुवार क्षणाची आठवण करुन देणारी होती.  एका जुन्या फोटोत श्रीदेवीसुद्धा बोनी कपूर यांच्या डोक्यावरील घाम पुसत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून रसिकांना आपल्या लाडक्या चांदनीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. 

६५व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात श्रीदेवी यांना मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 'मॉम' सिनेमातील भूमिकेसाठी श्रीदेवी यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी जान्हवीने आपल्या आईच्या खास साडी कलेक्शनमधील साडी परिधान केली होती. हीच साडी श्रीदेवी यांनी २०१२ साली टॉलीवुड अभिनेता रामचरनच्या लग्नात परिधान केली होती. 

टॅग्स :श्रीदेवीजान्हवी कपूर