Join us

​अभिनेत्रीचं नाही तर उत्तम चित्रकारही आहे श्रीदेवी ! या दोन चित्रांचा होणार लिलाव!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 6:40 AM

अभिनेत्री श्रीदेवी ही केवळ एक हनहुन्नरी अभिनेत्रीचं नाही तर एक उत्तम चित्रकारही आहे. होय, चित्रकला तिला चांगलीच अवगत आहे. ...

अभिनेत्री श्रीदेवी ही केवळ एक हनहुन्नरी अभिनेत्रीचं नाही तर एक उत्तम चित्रकारही आहे. होय, चित्रकला तिला चांगलीच अवगत आहे. आता तर श्रीदेवीच्या कुंचल्यातून साकारलेल्या  दोन चित्रांचा लिलावही होणार आहे. होय, चॅरिटीसाठी दुबईत तिच्या दोन पेन्टिंग लिलावात काढल्या जाणार आहेत.या चित्रांची सुरुवाती बोली १० लाख रूपये ठेवली गेली आहे.श्रीदेवीने साकारलेले एक चित्र सोनम कपूरचे आहे. यात सोनम कपूर तिचा डेब्यू सिनेमा ‘सावरियां’मधील लूकमध्ये आहे.तर दुसरे चित्र दिवंगत मायकल जॅक्सनचे आहे. श्रीदेवीने तिच्या फावल्या वेळात ही दोन्ही चित्रे साकारली आहेत. या दोन्ही पेन्टिंग्स श्रीदेवीच्या खास आवडीच्या पेन्टिंग्स आहेत.श्रीदेवी दीर्घकाळापासून हा छंद जोपासून आहे. २०१० मध्ये एका इंटरनॅशनल आर्ट हाऊसने तिला तिच्या चित्रांच्या लिलावाची आॅफर दिली होती. पण तेव्हा श्रीदेवीने नकार दिला होता. पण आता चॅरिटीसाठी श्रीदेवीने आपल्या दोन चित्रांच्या लिलावाची तयारी दाखवली आहे. या दोन्ही चित्रांच्या लिलावातून मिळणारी रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरली जाईल. दुबईत श्रीदेवीचे मोठे फॅन फॉलोर्इंग आहे. त्यामुळे तिच्या चित्रांना मोठी रक्कम मिळू शकते, असा अंदाज आहे.ALSO READ : ‘या’ हॉलिवूड निर्मात्याबरोबर लग्न करण्याच्या चर्चेवरून वैतागली होती श्रीदेवी!श्रीदेवीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ‘कंदन करुनई’ या तामिळ चित्रपटात ती बालकलाकार म्हणून दिसली होती. अनेक पौराणिक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. १६ व्या वर्षी श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तिचा पहिला चित्रपट अपयशी ठरला. पण श्रीदेवीने जितेंद्रसोबत ‘हिम्मतवाला’ साईन केला आणि श्रीदेवी रातोरात स्टार झाली. १९९६ साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली. बोनी कपूर यांनी  श्रीदेवीला ‘मि. इंडिया’ची आॅफर दिली. श्रीदेवीला हा चित्रपट करायचा नव्हता. म्हणून तिने या चित्रपटासाठी बोनीला १० लाख रुपए मानधन मागितले. त्याकाळात ही रक्कम फार मोठी होती. पण बोनीने श्रीदेवीची ही मागणी मान्य केली. हा चित्रपट तयार झाला आणि सुपरहिट झाला. याचदरम्यान श्रीदेवीची आई आजारी पडली आणि तिला उपचारासाठी अमेरिकेला न्यावे लागले. हा संपूर्ण खर्च बोनीने उचलला. बोनीच्या या स्वभावामुळे श्रीदेवी त्याच्या जवळ आली. पुढे त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. बोनी विवाहित होता. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन बोनीने श्रीदेवीशी लग्न केले.