Join us

​सुंदर दिसण्यासाठी श्रीदेवींनी केल्या होत्या २९ शस्त्रक्रिया, हेच तर ठरले नाही मृत्यूचे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 5:42 AM

उण्यापु-या ५४ व्या वर्षी श्रीदेवींनी जगाचा निरोप घेतला. शनिवारी रात्री दुबईतील एका हॉटेलात हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. खरे ...

उण्यापु-या ५४ व्या वर्षी श्रीदेवींनी जगाचा निरोप घेतला. शनिवारी रात्री दुबईतील एका हॉटेलात हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. खरे तर श्रीदेवींना हृदयासंदर्भात कुठलीही तक्रार नव्हती. पन्नाशी ओलांडूनही श्रीदेवी एकदम फिट होत्या. त्या स्वत:ची प्रचंड काळजी घ्यायच्या. अशास्थितीत अचानक हृदयविकाराचा धक्का यावा आणि यातच चाहत्यांच्या मनावर राज्य करणाºया या अभिनेत्रींने अलविदा म्हणावे, याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटतेय. त्यामुळेच श्रीदेवींच्या निधनानंतर अनेक चर्चाही सुरू झाल्या आहेत.  श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूसाठी डायटींग पिल्स, प्लास्टिक सर्जरी  असे सगळे कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे.चर्चा खरी मानाल तर, चिरतरूण दिसण्यासाठी श्रीदेवी मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टी एजिंग औषधे घेत होत्या. सुंदर दिसण्यासाठी त्यांनी सुमारे २९ शस्त्रक्रिया केल्या होत्या. यापैकी एक शस्त्रक्रिया योग्यप्रकारे झाली नव्हती. यामुळे श्रीदेवींना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. साऊथ कॅलिफोर्नियाच्या एका कॉस्मेटिक सर्जनच्या देखदेखीखाली श्रीदेवी या समस्या दूर करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून औषधे घेत होत्या. याशिवाय त्या ‘डाएट पिल्स’वरही होत्या. या डाएट पिल्समुळे त्यांच्या हृदयाला नुकसान होत होते. पोटावरची चरबी कमी करण्यासाठीही श्रीदेवींनी ट्रिटमेंट घेतली होती. चेहरा तरूण दिसावा यासाठी बोटाक्सचा वापर त्या करत होत्या. मृत्यूच्या अगदी महिनाभराआधी श्रीदेवींनी लिप सर्जरी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. याच्या पुराव्यादाखल त्यांचे काही ताजे फोटो व्हायरल झाले होते. यात श्रीदेवींचे ओठ सुजलेले दिसत होते. नेहमीप्रमाणे श्रीदेवींनी सर्जरी केल्याचा इन्कार केला होता. या अनेक शस्त्रक्रिया आणि डाएट पिल्सचा मारा हेच कदाचित श्रीदेवींच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे आता मानले जात आहे. ALSO READ : PICS : श्रीदेवी यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी बॉलिवूड सेलिब्रेटींची गर्दी!