Join us

‘या’ हॉलिवूड निर्मात्याबरोबर लग्न करण्याच्या चर्चेवरून वैतागली होती श्रीदेवी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 1:36 PM

८० आणि ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री श्रीदेवी हिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. श्रीदेवीचा ...

८० आणि ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री श्रीदेवी हिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. श्रीदेवीचा उत्तर भारतात जेवढा जलवा होता, त्यापेक्षा कितीतरी पटीने ती दक्षिण भारतात प्रसिद्ध होती. अभिनय आणि डान्सिंगमध्ये पारंगत असलेल्या श्रीदेवीने जेव्हा आपला जलवा दाखविण्यास सुरुवात केली तेव्हा तिला संबध बॉलिवूडमध्ये मिस हवाहवाई या नावाने ओळखले जाऊ लागले. श्रीदेवी तिच्या चित्रपटांवरून जेवढी चर्चेत असायची त्यापेक्षा कितीतरी पटीने ती तिच्या लग्नाच्या चर्चेवरून माध्यमांमध्ये झळकायची. जितेंद्र, मिथून चक्रवर्ती यांच्यासोबतच्या अफेअरबरोबरच बोनी कपूरसोबत केलेल्या लग्नाची चाहत्यांमध्ये खरपूस चर्चा रंगत असे. याव्यतिरिक्त हॉलिवूडच्या एका निर्मात्यासोबत श्रीदेवीने लग्न केल्याची चर्चाही त्यावेळी वाºयासारखी पसरली होती. या चर्चेमुळे श्रीदेवी एवढी वैतागली होती की, तिने चक्क पत्रकार परिषद आयोजित करून त्यामध्ये याबाबतचा विस्तृत खुलासा केला होता. ९० च्या दशकात श्रीदेवीचे नाव हॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता अशोक अमृतराज यांच्याशी जोडले गेले होते. असे म्हटले जात होते की, श्रीदेवी लवकरच अशोक अमृतराज यांच्याशी विवाह करणार आहे. मात्र या बातमीत फारसे तथ्य नसल्याने श्रीदेवीला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्याचबरोबर जे निर्माता, दिग्दर्शक श्रीदेवीसोबत चित्रपट करीत होते, त्यांनाही या चर्चेने वैतागून सोडले होते. कारण या बातमीमुळे बॉलिवूडमधील बºयाचशा निर्माता आणि दिग्दर्शकांच्या लाखो रुपयांची एकप्रकारे बोली लागली होती. त्याकाळी असे समजले जात होते की, अभिनेत्रीने लग्न केल्यानंतर तिचे करिअर जवळपास संपते. त्यातच निर्माता, दिग्दर्शकांना तेव्हा झटका बसला जेव्हा श्रीदेवीच्या आईने या लग्नाला परवानगी दिल्याची बातमी समोर आली. मात्र या सर्व अफवा असल्याने श्रीदेवी आणि तिच्या परिवारातील इतर सदस्य चांगलेच त्रस्त झाले होते. त्यावेळी श्रीदेवीला तर एवढा मनस्ताप सहन करावा लागला की, त्याकाळी तिने ही बातमी पसरविणाºयाचा अक्षरश: शोध घेतला. परंतु हे तिला अखेरपर्यंत कळू शकले नाही. अखेर तिने पत्रकार परिषदेत या सर्व अफवा असल्याचे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला.