RRR Box office Collection Day : रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलिया भट, अजय देवगण अशी तगडी स्टारकास्ट असलेला दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमानं अक्षरश: धुमाकूळ घातला. होय, चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे दोन दिवस झाले आहेत आणि अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटानं कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत, नवा इतिहास रचला आहे. होय, पहिल्याच दिवशी या सिनेमाने वर्ल्डवाईड 240 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी हा आकडा वाढून 340-350 कोटींवर पोहोचला. म्हणजेच दोन दिवसांत या चित्रपटाने एकूण 580 कोटींची कमाई केली.
जाणकारांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘आरआरआर’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी 23 टक्के वाढ दिसली. ‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनने काल दुसऱ्यादिवशी 23.75 कोटींचा गल्ला जमवला. तेलगू व्हर्जनने 32 कोटी तर अन्य भाषांत 110 कोटींचा बिझनेस केला. केवळ भारतातच नाही तर अमेरिका, कॅनडा आणि वरअ या देशांमध्ये देखील हा चित्रपट चांगली कमाई करत आहे.
मोडला बाहुबली 2 चा रेकॉर्डराजमौलींच्या ‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’ या चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. ‘बाहुबली 2’ ने तर सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड रचला होता. राजमौलींच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने ‘बाहुबली 2’चा रेकॉर्डही मोडला. ‘बाहुबली’ने पहिल्या दिवशी वर्ल्डवाईड 75 कोटी तर ‘बाहुबली 2’ने 217 कोटींची कमाई केली होती. पण ‘आरआरआर’ने पहिल्याच दिवशी वर्ल्डवाईड 240 कोटींचा बिझनेस करत हा रेकॉर्ड मोडीत काढला. आरआरआर चित्रपटाच्या निर्मात्यांनी 22 मार्चपासून प्री बुकिंगची सुरूवात केली. प्री- बुकिंग आणि राइट्सच्या माध्यामातून या चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच 750 कोटींची कमाई केली. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचा सर्व भाषांमधील प्री-रिलीज थियेट्रिकल बिजनेस हा 520 कोटी आहे. एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण , ज्युनियर एनटीआर आणि राम चरण अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे.