Join us

RRR: हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्समध्ये RRRचा डंका, ठरला जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 11:23 AM

RRR ला सर्वोत्कृष्ट आंतराराष्ट्रीय सिनेमा म्हणून पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय बेस्ट ऍक्शन सिनेमा म्हणून RRR ने पुरस्कार पटकावला आहे.

साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट रोज यशाची नवी शिखर पार करतोय. चित्रपटाच्या नाटू नाटू या गाण्याने पहिल्या गोल्डन ग्लोब पुरस्कारात सर्वोत्कृष्ट जिंकून इतिहास रचला आहे. आता ते ऑस्कर 2023 च्या शर्यतीत आहे. त्याच वेळी, या सर्वांमध्ये, RRRने हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्स  (HCA Film Awards)देखील जिंकले आहेत. या चित्रपटाने वेगवेगळ्या श्रेणींमध्ये तीन पुरस्कार पटकावले आहेत.

एसएस राजामौली यांच्या चित्रपटाने पुन्हा एकदा देशाची मान उंचावली आहे. नुकत्याच झालेल्या हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्समध्ये RRR ने तीन श्रेणींमध्ये विजेतेपद पटकावले. 12 मार्च रोजी होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारापूर्वी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण स्टारर आरआरआरने तीन पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. 

हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कारांमध्ये RRR ने सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन फिल्म, सर्वोत्कृष्ट स्टंट आणि सर्वोत्कृष्ट गाणं (नाटू नाटू)साठी अवॉर्ड जिंकलं. चित्रपटाचे संगीत एमएम कीरावानी यांनी दिले आहे. एसएस राजामौली दिग्दर्शित RRR साठी ऑस्कर 2023 च्या आधी ही एक मोठीबाब आहे. नाटू नाटू ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्यासाठी नामांकन मिळाले आहे.

RRR बद्दल बोलायचे तर, हा एक पीरियड ड्रामा आहे ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण आदिवासी नेते कोमाराम भीम आणि क्रांतिकारक अल्लुरी सीता रामा राजू यांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे आलिया भट्टने टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याशिवाय अजय देवगण, श्रिया सरन, समुथिरकणी, रे स्टीव्हन्सन, मकरंद देशपांडे आणि ऑलिव्हिया मॉरिस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. 

टॅग्स :आरआरआर सिनेमाएस.एस. राजमौलीराम चरण तेजाTollywood