एसएस राजामौली हे सर्वात प्रसिद्ध आणि प्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहेत. 'RRR'च्या यशानंतर एसएस राजामौली हे नाव जगभरात पोहोचले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला 'बाहुबली' फ्रेंचायझी आणि 'RRR' सारखे चित्रपट देणारे एसएस राजामौली यांनी खुलासा केला आहे की ते 'महाभारत' वर चित्रपट बनवण्याचे स्वप्न पाहत आहेत.
RRR चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीत सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून मी या ड्रीम प्रोजेक्टवर काम करण्याचा विचार करत आहे आणि जर भविष्यात महाभारतावर चित्रपट बनवण्याची संधी मिळाली तर त्याला न्याय देण्यासाठी ते १० भागांमध्ये बनवणार आहेत. कारण हा विषय प्रेक्षकांच्या भावनांशी जोडलेला आहे आणि ते हा चित्रपटात तयार करताना प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्ण काळजी घेतील, असे ते म्हणाले.
अलीकडेच, दिग्दर्शकाने एका कार्यक्रमात हजेरी लावली जिथे त्यांनी पुन्हा एकदा 'महाभारत'वर चित्रपट बनवण्याच्या त्याच्या स्वप्नाबाबत भाष्य केलं. सध्या देशात उपलब्ध असलेल्या महाभारताची प्रत्येक आवृत्ती वाचण्यासाठी त्यांना किमान एक वर्षाचा कालावधी लागेल आणि त्यांना हा चित्रपट तयार करताना कोणातीच घाई करायची नाही.
ते म्हणाले- आपल्या देशात महाभारताच्या विविध आवृत्त्या आहेत. ते सर्व वाचायला मला किमान एक वर्ष लागेल आणि जर मी महाभारतावर चित्रपट बनवला तर तो 10 भागांमध्ये असेल. महाभारतावर चित्रपट बनवायचा हा विचार माझ्या मनात आहे.
जुन्या मुलाखतींमध्ये राजामौली यांनी महाभारतावर चित्रपट बनवणे हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले आहे. कार्यक्रमात राजामौली म्हणाले- मी जेव्हाही चित्रपट बनवतो तेव्हा मला असे वाटते की मी महाभारतावर चित्रपट बनवण्यासाठी हे सर्व शिकत आहे. काहीतरी मोठं करायचं असेल तर छोट्या स्टेप्समधून शिकणं खूप गरजेचं आहे. माझा प्रत्येक चित्रपट म्हणजे महाभारतावर चित्रपट बनवण्यासाठी उचललेले पाऊल आहे, एक छोटासा प्रयत्न.