Join us

SS Rajamouli: 'RRR' काही बॉलिवूड सिनेमा नाही..., गोल्डन ग्लोब जिंकताच राजमौलींचा सूरच बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 11:08 AM

Ss Rajamouli : 'नाटू- नाटू' या गाण्याने ग्लोडन ग्लोब पुरस्कार जिंकला. याचदरम्यान राजमौली असं काही बोलून गेलेत की, त्यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड विरूद्ध साऊथ वादाला तोंड फोडलं आहे...

साऊथचे दिग्दर्शक एस एस राजामौली (Ss Rajamouli ) यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाने देशातच नाही तर जगभर धुमाकूळ घातला. ८० व्या गोल्डन ग्लोब अवार्ड सोहळ्यात या राजमौलींच्या या चित्रपटाने नवा इतिहास रचला. 'आरआरआर'च्या ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्गसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe ) मिळाला. शिवाय वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांचा ‘RRR’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांसाठी शॉर्टलिस्ट झाला. अनेक वर्षानंतर भारतीय चित्रपटसृष्टीमधील चित्रपटाने ही कमाल करून दाखवली. साहजिकच राजमौलींचं सध्या जगभर कौतुक होत आहे. पण याचदरम्यान राजमौलींच्या एका वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. होय, 'आरआरआर' हा काही बॉलिवूड सिनेमा नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

 'नाटू- नाटू' या गाण्याने रिहाना आणि लेडी गागा यांच्या गाण्यांना टक्कर देत ग्लोडन ग्लोब पुरस्कार जिंकला. याचदरम्यान राजमौली असं काही बोलून गेलेत की, त्यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड विरूद्ध साऊथ वादाला तोंड फोडलं आहे.

अमेरिकेत 'आरआरआर'च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान राजमौली बोलले. ते म्हणाले, 'आरआरआर' हा काही बॉलिवूड चित्रपट नाहीये. हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधला तेलगू चित्रपट आहे. जिथून मी आलेलो आहे. मी काही चित्रपट थांबवण्याऐवजी किंवा फक्त प्रेक्षकांना नृत्य दाखवण्यासाठी चित्रपटात मुद्दाम गाणी टाकत नाही. तर चित्रपट आणखी पुढे नेण्यासाठी गाणी बनवतो. मी कथा पुढे नेण्यासाठी त्या गोष्टी करतो. तीन तास कसे गेलेत हे कळलंच नाही, असं तुम्ही चित्रपटाच्या शेवटी  म्हणत असाल तर मला माहितीये की मी एक चांगला चित्रपट बनवलाय. मी एक चांगला निर्माता आहे. राजामौली यांच्या या विधानाने साहजिकच बॉलिवूडप्रेमी नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर राजमौलींच्या या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.  

'आरआरआर' चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी १९२० मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वतंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटीश कलाकार रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 'आरआरआर' ने जगभर १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. याआधी न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल अवॉर्डमध्ये राजामौली यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. RRR ऑस्करसाठीही सर्व कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट झाला आहे.  

टॅग्स :आरआरआर सिनेमाएस.एस. राजमौलीTollywoodबॉलिवूड