Join us

बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबाबत मोठा खुलासा, सारा अली खानने रियाला अनेकवेळा ड्रग्स दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 11:55 AM

रिया चक्रवर्तीने ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.

सुशांत सिंग प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर  रिया चक्रवर्तीने एनसीबीसमोर बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं सांगितली होती. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार रिया चक्रवर्तीने ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने रियाकडून अनेक वेळा ड्रग्स घेतले आहे. रिपोर्टनुसार सारा अली खान एका हाय प्रोफाईल ड्रग्स पेडलरच्या संपर्कात होती, ज्याचा तपास आता एनसीबी करते आहे.  साराकडून ड्रग्स घेऊन रियाने अनेक वेळा सुशांत सिंग राजपूतला दिला होता.

रियासह 16 जणांना अटक 

एनसीबीने आतापर्यंत रियासह 16 लोकांना अटक केले आहे. रियाने दिलेल्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या कारवाईला वेग आलेला आहे. ड्रग्ज डीलर अनुज केशवानी, गौरव आर्या यांनीही महत्त्वाची महिती दिली असून गोवा आणि मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकून चौकशी करण्यात येत आहे. एनसीबीने छापेमारीदरम्यान धडक कारवाई करताना करमजीतला दोन दिवसांपूर्वा अटक केली. ड्रग्ज जगतात तो 'केजे' या नावाने प्रसिद्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. करमजीत हा कॅपरी आणि लिटिल हाइट्स हे ड्रग्ज सप्लाय करायचा अशी समोर आली आहे. सुशांत-रिया ड्रग्ज कनेक्शनमध्ये करमजीत हा महत्त्वाचा पुरावा आहेत. करमजीत हा सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला ड्रग्ज सप्लाय करायचा

एका टॉप फिल्ममेकरचे नाव?सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, एनसीबीने केलेल्या चौकशीत रियाने एका दिग्गज दिग्दर्शकाचे नाव घेतले आहे. रियाच्या दाव्यानुसार, याच दिग्दर्शकाने सुशांतला ड्रग्जचे व्यसन लावले. हा दिग्दर्शक सुशांतला पार्टीमध्ये घेऊन जायचा आणि तेथे कोकेन, एलएसडी आणि गांजाचे सेवन व्हायचे. सीएनएन न्यूज18 ने याबाबतचे वृत्त दिले आहे. रियासोबत रिलेशनशिपमध्ये असताना सुशांतने स्वत: तिला या बड्या दिग्दर्शकाबद्दल सांगितले होते.

सुशांतच्या घरून रियाने स्वत:च्या घरी कुरिअर केला होता अर्धा किलो गांजा सुशांत सिंग राजपूत केस मध्ये ड्रग चॅट समोर आल्यानंतर एनसीबीचा तपासही महत्वाचा ठरत आहे. एनसीबीला त्यांच्या तपासात आढळून आले की, लॉकडाऊन दरम्यान सुशांत सिंग राजपूतचा काही दिवस रिया चक्रवर्तीच्या घरी घालवायचे होते. यासाठी रिया आणि सुशांतने निर्णय घेतला की, एका फास्ट डिलिव्हरी कुरिअर कंपनीच्या माध्यमातून गांजा रियाच्या घरी पाठवला जावा. चौकशीतून ही बाब कन्फर्म झाली आहे. एका रिपोर्टनुसार, एनसीबीच्या चौकशीत रिया चक्रवर्ती, शौविक आणि इतरांच्या जबाबातून समजले की, सुशांत आणि रियानने घरच्या काही सामानासोबत एका बॉक्समध्ये जवळपास अर्धा किलो गांजा एप्रिल महिन्यात रियाच्या घरी पाठवला होता. तपासातून असेही समोर आले की, हे काम सुशांतकडे काम करणा-या दीपेश सावंतने केले होते़ त्याने कुरिअर कंपनीला हे सामान रियाच्या सांताक्रूज येथील फ्लॅटवर डिलिव्हर करण्यास सांगितले होते़ रियाच्या घरी हे गांजाचे पॅकेट शौविकने रिसीव्ह केले होते. 

फक्त मनोरंजनासाठी रियाचे आयुष्य पणाला लावू नका..! ट्विंकल खन्ना ‘मीडिया ट्रायल’वर भडकली

 

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत