Join us

Star Kids : आता मिथून चक्रवतीची स्टायलिश मुलगीही बॉलिवूडच्या वाटेवर; पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2017 11:58 AM

सध्या बॉलिवूड स्टार्स किड्स सोशल मीडियावर आपला प्रभाव पाडण्यासाठी वाट्टेल ती धडपड करताना दिसत आहेत. त्यामुळेच दर आठवड्याला एक ...

सध्या बॉलिवूड स्टार्स किड्स सोशल मीडियावर आपला प्रभाव पाडण्यासाठी वाट्टेल ती धडपड करताना दिसत आहेत. त्यामुळेच दर आठवड्याला एक तरी स्टार्स किड्स सोशल मीडियामुळे चर्चेत असतो. यावेळेस मिथून चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असून, तिची ही सर्व धडपड बॉलिवूड डेब्यूसाठी सुरू असल्याचे समजते. सध्या दिशानी न्यूयॉर्क येथील फिल्म अकॅडमीमध्ये अभिनयाचे धडे घेत असून, वडिलांप्रमाणेच तिलाही बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. बॉलिवूडचा डिस्को डान्सर अशी ओळख असलेले मिथून चक्रवर्ती अजूनही इंडस्ट्रीमध्ये अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या ते ‘हसन राजा’ या बंगाली सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. राहुल अमीन निर्मित या सिनेमात मिथूनबरोबर रायमा सेन बघावयास मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने जेव्हा मिथूनला मुलीच्या करिअरविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी दिशानीच्या डेब्यूविषयीचे संकेत दिले होते. दरम्यान, दिशानी सध्या इन्स्टाग्रामवर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असून, बी-टाउनची मोस्ट स्टायलिश स्टार डॉटर्स आहे. त्यामुळेच तिचे इन्स्टाग्राम फ्रेंड्स आणि फन अ‍ॅक्टिव्हिटीने भरलेले आहे. मिथूनदाच्या चार मुलांपैकी सर्वात लहान असलेली दिशानी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावू इच्छिते. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे धडे घेत असून, अ‍ॅक्टिंग हा तिचा आवडता विषय आहे. तिच्या बॉलिवूड करिअरला वडील मिथूननेही ग्रीन सिग्नल दिल्याने लवकरच ती एखाद्या बॉलिवूड सिनेमात झळकण्याची शक्यता आहे. दिशानी त्यांच्या पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम करते. त्यांच्यासोबतचे फोटोज् ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करीत असते. या अगोदर दिशानीचा मोठा भाऊ मिमोहने २००८ मध्ये ‘जिमी’ नावाच्या सिनेमातून डेब्यू केला होता. मात्र या सिनेमाला प्रेक्षकांनी सपशेल नाकारल्याने त्याचा बॉलिवूड डेब्यू पूर्णत: फ्लॉप ठरला. सध्या मिमोहने त्याचे नाव बदलून ‘महाक्षय’ असे ठेवले आहे. तर मिमोहचा लहान भाऊ रिमोह अजूनही स्ट्रगल करीत आहे. २००८ मध्ये आलेल्या ‘फिर कभी’मध्ये रिमोहने मिथून चक्रवर्तीच्या यंगर वर्जनची भूमिका साकारली होती. मात्र त्यानंतर त्याला फारशी संधी मिळाली नाही. आता त्याच्याकडे स्ट्रगल अ‍ॅक्टर म्हणून बघितले जात आहे. रिमोहनेही त्याचे नाव बदलून ‘उश्मेय चक्रवर्ती’ असे ठेवले आहे. तर मिथूनदाचा सर्वात लहान मुलगा नमाशी शिक्षण घेत असून, त्यालादेखील बॉलिवूडमध्येच करिअर करायचे असल्याचे समजते. मिथून चक्रवर्ती यांचे बॉलिवूड योगदान कौतुकास्पद असे राहिले आहे. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमेही दिले आहेत. दोन फिल्मफेअर, तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या मिथूनदाची अजूनही बॉलिवूड वाटचाल सुरूच आहे. आता त्यांची मुलेही या वाटेवर चालण्यात सज्ज आहेत, असेच एकूण दिसत आहे.