वर्षाच्या अखेरीस अनेक पुरस्कार सोहळे पाहायला मिळतात. नुकत्याच मुंबईत रंगलेल्या स्टार स्क्रिन अवार्ड्समध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा दिसला. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे नवदाम्पत्य या पुरस्कार सोहळ्यात आवर्जून उपस्थित होते. तसेच आलिया भट, कॅटरिना कैफ, श्रद्धा कपूर, विकी कौशल, राजकुमार राव, रेखा आणि सलमान खान या कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्याला चार चाँद लावले.
स्टार स्क्रिन पुरस्कार सोहळ्यात यांनी मारली बाजी...
सर्वोत्कृष्ट अभिनेता (पॉप्युलर)रणवीर सिंग (पद्मावत)राजकुमार राव (स्त्री)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पॉप्युलर)आलिया भट (राजी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकश्रीराम राघवन (अंधाधुंद)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती)गजराज राव (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती)नीना गुप्ता (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट चित्रपटस्त्री
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती)मुल्क
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतापंकज त्रिपाठी (स्त्री)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसुरेखा सिक्री (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट पदार्पण - अभिनेताइशान खट्टर (बियाँड द क्लाऊड्स)
सर्वोत्कृष्ट पदार्पण - अभिनेत्रीराधिका मदन (पटाखा)
सर्वोत्कृष्ट अॅक्शनअहमद खान (बागी 2)
सर्वोत्कृष्ट लेखनअर्जित बिस्वास, श्रीराम राघवन (अंधाधुंद)
बेस्ट रिअल स्टार अवॉर्ड ऑन सोशल मीडियाकॅटरिना कैफ
लाइफटाइम अॅचिव्हमेंट अवॉर्डशबाना आझमी
सर्वोत्कृष्ट गीतकार गुलजार (हे वतन - राजी)
सर्वोत्कृष्ट गायकअर्जित सिंग (ए वतन - राजी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण - दिग्दर्शकअमर कौशिक (स्त्री)
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीपद्मावत
सर्वोत्कृष्ट संवादस्त्री
सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफीतुंबाड
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईनअमित आणि सुब्रतो (राजी)
सर्वोत्कृष्ट कॉश्च्युमपद्मावत
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइनमधू (अंधाधुंद)
सर्वोत्कृष्ट संगीतअमित त्रिवेदी (मनमर्जिया)
सर्वोत्कृष्ट गायिकाहरदिप कौर (दिलबरो-राजी)
स्टार स्क्रीन अवार्ड शोमध्ये रणवीर सिंगला ‘पद्मावत’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर दीपिका भावूक झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
रणवीरने पुरस्कार स्वीकारल्यानंतर एक हृदयस्पर्शी भाषण दिले. हे भाषण होते खास दीपिकासाठी. ‘चित्रपटात मला राणी मिळाली नाही. पण खऱ्या आयुष्यात मला माझी राणी मिळाली,’असे रणवीर म्हणाला. तो केवळ इथेच थांबला नाही तर दीपिकाबद्दलचे प्रेमही त्याने व्यक्त केले. बेबी, आय लव्ह यू...मी सहा वर्षांत जे काही मिळवले. ते केवळ तुझ्यामुळे. कारण तू मला माझ्या लक्ष्यापासून विचलित होऊ दिले नाहीस. तुझे मनापासून आभार...असे रणवीर म्हणाला. पतीच्या तोंडून इतके कौतुक ऐकल्यानंतर कुठल्या पत्नीचे डोळे भरून येणार नाहीत. रणवीरचे ते शब्द ऐकताच दीपिकाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.