Join us

सलमान खानला वाटतेय स्टारडम जाण्याची भीती? वाचा काय म्हणणे आहे त्याचे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 12:24 PM

सलमानची एक झलक पाहाण्यासाठी लोक कित्येक तास त्याच्या घराच्या बाहेर उभे असतात. यावरूनच आपल्याला सलमानच्या स्टारडमची कल्पना येते.

ठळक मुद्देमी, शाहरुख, आमिर, अजय, अक्की यांनी सगळ्यांनीच गेल्या कित्येक वर्षांपासून हे स्टारडम टिकवून ठेवले आहे. कोणताही सुपरस्टार असला तरी काही काळांनी त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आठ-ते दहा टक्क्यांनी कमी होतेच असे मला वाटते.

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. सलमानने बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे. त्याचा भारत हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांना खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. सध्या तो त्याच्या दबंग 3 या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून या चित्रपटासाठी तो कित्येक किलो वजन कमी करत आहे. सलमान बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असला तरी तो आजही त्याच्या  प्रत्येक चित्रपटावर तितकेच काम करतो.

सलमानने आजवर त्याच्या कारकिर्दीत हम आपके है कौन, मैंने प्यार किया, वाँटेड, दबंग, रेडी, भारत, बजंरगी भाईजान यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सलमानचे चित्रपट म्हटले की, बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीहून अधिक गल्ला जमवणारच असे म्हटले जाते. सलमानला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे.

सलमानची एक झलक पाहाण्यासाठी लोक कित्येक तास त्याच्या घराच्या बाहेर उभे असतात. यावरूनच आपल्याला सलमानच्या स्टारडमची कल्पना येते. सलमान हा एक स्टार असून गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

सलमानला प्रचंड स्टारडम आज असले तरी ते कधी ना कधी संपणार हे त्याला चांगलेच माहीत आहे. त्याने फिल्मफेअरला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, स्टारडम कधी कधी ना कधी संपणार... स्टारडम खूप वेळापर्यंत टिकून ठेवणे हे अतिशय कठीण असल्याचे मला वाटते. पण तरीही मी, शाहरुख (शाहरुख खान), आमिर (आमिर खान), अजय (अजय देवगण), अक्की (अक्षय कुमार) यांनी सगळ्यांनीच गेल्या कित्येक वर्षांपासून हे स्टारडम टिकवून ठेवले आहे. कोणताही सुपरस्टार असला तरी काही काळांनी त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आठ-ते दहा टक्क्यांनी कमी होतेच असे मला वाटते. पण अद्याप तरी माझ्यासोबत असे झालेले नाहीये याचा मला आनंद आहे. 

टॅग्स :सलमान खान