Join us

रक्षाबंधनासाठी आई आणि आजीसोबत आली चिमुकली राहा, कपूर कुटुंबात जोरदार सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 16:58 IST

आलियाच्या कडेवर बसलेली राहाची दिसली झलक

रणबीर कपूर आणि आलिया भटची लाडकी लेक राहा कपूर (Raha Kapoor) आता मोठी होत आहे. ती आणखी क्युट दिसत आहे. केसांची पोनी वर बांधून राहा जेव्हा एन्ट्री घेते तेव्हा सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं. या दीड वर्षांच्या चिमुकल्या राहाची आज पुन्हा झलक दिसली. आज रक्षाबंधनासाठी राहा आई आणि आजीसोबत आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी पोहोचली आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पतौडी कुटुंबाचं रक्षाबंधन साजरं झाल्यावर आता कपूर कुटुंबातही सेलीब्रेशन सुरु झालं आहे. करीना कपूर जेहला घेऊन पोहोचली. तर तिच्या मागोमाग आलिया भटही राहाला घेऊन आली. त्यांच्यासोबत आजी नीतू कपूरही दिसत आहे. आलियाने राहाला कडेवर घेतलं असून राहा प्रश्नार्थक चेहऱ्याने पापाराझींकडे पाहत आहे. आलिया आणि नीतू यांनी आकाशी रंगाचा ड्रेस घातला आहे. तर राहाचा पिंक रंगाचा आऊटफिट आहे. राहाची ही पहिलीच राखी पौर्णिमा असल्याने आलियाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय.

आता कपूर कुटुंबाच्या रक्षाबंधनाचे फोटो कधी समोर येताएत याची चाहते वाट पाहत आहेत. कालच रणबीर कपूर राहाला घेऊन नवीन घराच्या कंन्स्ट्रक्शनची पाहणी करण्यासाठी आला होता. तर आज आलियासोबत राहाची झलक दिसली. तिच्या क्युटनेसने मात्र सर्वांनाच घायाळ केलं आहे. 

सध्या आलिया आणि रणबीर दोघंही व्यस्त आहेत. रणबीर 'रामायण' सिनेमाची तयारी करतोय तर आलिया यशराजच्या स्पाय युनिव्हर्समध्ये दिसणार आहे. दोघंही लेकीसाठी वेळात वेळ काढत आहेत.  

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडपरिवारसोशल मीडिया