Join us

​स्टार्स देतायत चित्रपट करिअरला नवी दिशा !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 11:06 AM

-रवींद्र मोरे बॉलिवूडमध्ये कधी काय होईल याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. कोण कधी आणि कशी कमाल करेल हे ...

-रवींद्र मोरे बॉलिवूडमध्ये कधी काय होईल याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. कोण कधी आणि कशी कमाल करेल हे निश्चितही सांगता येणार नाही. एकीकडे बरेच अ‍ॅक्टर्स आपली एक भूमिका हिट झाल्यानंतर त्याच प्रकारची भूमिका साकारणे पसंत करतात तर दुसरीकडे कधी कधी काही अ‍ॅक्टर्स आपल्या करिअरला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतात. आज आपण अशाच काही अ‍ॅक्टर्सच्या बाबतीत जाणून घेऊया जे आपली नेहमीची भूमिका सोडून यावर्षी एक वेगळीच भूमिका साकारताना दिसणार आहेत.  * रणवीर सिंह'राम लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या सारख्या चित्रपटात गंभीर भूमिका केल्यानंतर रणवीर सिंह यंदा वेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. यावर्षी रणवीर जोया अख्तरच्या 'गली बॉय' चित्रपटात स्ट्रीट रॅपर आणि रोहित शेट्टीचा कॉमेडी चित्रपट 'सिम्बा' मध्ये एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. * वरुण धवन करण जौहरच्या 'स्टुडंट आॅफ द ईयर' चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण करणाºया वरुण धवनने आजपर्यंत एकही फ्लॉप चित्रपट दिला नाही. मात्र यावर्षी वरुण मसाला एंटरटेनर चित्रपटांव्यतिरिक्त 'आॅक्टोबर' आणि 'सुई धागा' या सारख्या मोठ्या कॉँटेंटवर आधारित चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटातील वरुणची भूमिका दर्शकांना आवडेल की नाही हे आता आगामी काळच ठरवेल.  * राजकुमार राव मोठ्या कॉँटेंटवर आधारित चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर राजकुमार रावकडे यावर्षी मेनस्ट्रीम फ्लेवरचे जास्त चित्रपट आहेत. २० एप्रिलला रिलीज होणाऱ्या 'ओमेर्टा' व्यतिरिक्त राजकुमार सोनम कपूरसोबत 'एक लडकी को देखा दो ऐसा लगा' आणि ऐश्वर्या राय सोबत 'फन्ने खॉँ' या सारख्या चित्रपटात दिसणार आहे.  * अक्षय कुमार अक्षय कुमार बऱ्याच काळापासून एकानंतर एक सोशल ड्रामा चित्रपट जसे 'टॉयलेट: एक प्रेम कथा' आणि 'पॅड मॅन' करताना दिसत आहे. विशेष म्हणजे अशा चित्रपटांसाठी त्याने कॉमेडी चित्रपटांपासूनही काही वेळासाठी ब्रेक घेतला आहे. मात्र यावर्षी तो आपल्या चित्रपटांची टेस्ट थोडी बदलू इच्छित आहे. यावर्षी तो सारागढीच्या युद्धावर आधारित 'केसरी' आणि एक स्पोर्ट बायोपिक 'गोल्ड' अशा दोन मोठ्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.  * ऋतिक रोशन गेल्या वर्षीच्या 'काबिल' चित्रपटाद्वारे ऋतिक रोशनने आपल्या करिअरला एक नवे वळण दिले आहे ज्यावर तो यावर्षीदेखील चालणार आहे. यंदा तो 'क्रिश 4' शिवाय 'सुपर 30' मध्ये काम करत आहे. या चित्रपटात तो पटनाचे मॅथ प्रोफेसर आनंद कुमार यांच्या आयुष्याशी प्रेरित भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून ऋतिक पहिल्यांदाच बायोपिकमध्ये दिसणार आहे.