...हे स्टार्स कपिल शर्माच्या शोपासून राहिले चार हात लांब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2017 3:21 PM
जबरदस्त टीआरपी, पॉपुलर कॉमेडी कलाकार, भारताबरोबरच जगभरात लाभलेला प्रेक्षकवर्ग अशा सर्वच पातळ्यांवर सरस असलेल्या ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ या ...
जबरदस्त टीआरपी, पॉपुलर कॉमेडी कलाकार, भारताबरोबरच जगभरात लाभलेला प्रेक्षकवर्ग अशा सर्वच पातळ्यांवर सरस असलेल्या ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ या रिअॅलिटी शोमध्ये कोणाला जायला आवडणार नाही. सिनेमाच्या प्रमोशनसाठी तर या शोसारखा दुसरा उत्तम प्लॅटफॉर्म नसल्याने प्रत्येक कलाकार कपिलच्या शोमध्ये हजेरी लावण्यास उत्सुक असतो. सलमान खान, शाहरूख खान, हृतिक रोशन या दिग्गज स्टार्सबरोबरच महानायक अमिताभ बच्चन यांनादेखील या शोमध्ये येण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र अशातही काही स्टार्स असे आहेत, ज्यांनी अद्यापपर्यंत या शोमध्ये हजेरी लावलेली नाही. काय कारण असू शकते की, हे स्टार्स कपिलच्या शोपासून दूर आहेत, हेच जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न... मिस्टर परफेक्टनिस आमिर खानआपल्या सिनेमाचे खास अंदाजात प्रमोशन करणारा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस अर्थात आमिर खान याने अद्यापपर्यंत कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावलेली नाही. धूम-३ (२०१३), पीके (२०१४) आणि नुकताच रिलिज झालेला दंगल (२०१६) या सिनेमांच्या प्रमोशनसाठी आमिरने कपिलच्या शोमध्ये जाण्यास टाळले. कारण आमिर प्रमोशनसाठी खास प्लॅन करीत असतो. अद्यापपर्यंत तो त्यात यशस्वी होत आल्यानेच त्याचे सर्व सिनेमे बॉक्स आॅफिसवर ब्लॉकबस्टर ठरत आहेत. दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतदक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत यांचा सिनेमा रिलिजच्या अगोदरच प्रचंड चर्चेत असतो. २०१३ पासून त्यांचे तीन सिनेमे रिलिज झाले आहेत. लिंगा (२०१३), कोचडयान (२०१४) आणि २०१६ या वर्षाच्या अखेरीस ‘कबाली’ हे सिनेमे रिलिज झाले. मात्र त्यांनी या तिन्ही सिनेमांच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली नाही. खरं तर रजनीकांत यांच्या सिनेमांचे प्रमोशन हा भाग गौण समजला जातो. कारण रिलिज अगोदरच हे सिनेमे सुपरहिट ठरतात. संजय दत्त२०१३ आणि २०१४ या सालात संजूबाबा अर्थात संजय दत्त याचे चार सिनेमे रिलिज झाले. मात्र अद्यापपर्यंत त्याला कपिलच्या शोमध्ये हजेरी लावता आली नाही. अवैद्य शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा कारागृहातून शिक्षा भोगून आलेला संजूबाबा त्यादरम्यान कपिलच्या शोमध्ये जाऊ शकला नाही, मात्र आगामी काळात तो या शोमध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे. श्रीदेवीएकेकाळी बॉलिवूडमध्ये स्वत:चे वलय निर्माण करणारी श्रीदेवी आजही तेवढीच सक्रिय आहे. प्रेक्षकांना तिच्या अभिनयाची जादू आजही बघायला मिळत असल्याने, ती कपिलच्या शोमध्ये केव्हा हजेरी लावणार याची त्यांना प्रतीक्षा आहे. वास्तविक २०१३ पासून तिचा एकही सिनेमा रिलिज झाला नसला तरी २०१७ मध्ये तिचा ‘मॉम’ हा सिनेमा येत आहे. आता ती या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये जाणार की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईलच. नाना पाटेकरआपल्या विशिष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले नाना पाटेकर हेदेखील कपिलच्या शोपासून चार हात लांबच राहिले आहेत. २०१५ मध्ये नाना यांचे ‘अब तक छप्पन-२’ आणि ‘वेलकम बॅक’ हे दोन सिनेमे रिलिज झालेत. मात्र त्यांनी या सिनेमांच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये जाणे टाळले. या सिनेमांमधील त्यांचे सहकलाकार अनिल कपूर आणि जॉन अब्राहम यांनी मात्र कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली होती. राधिका आपटे२०१३ पासून आतापर्यंत राधिका आपटे हिचे ‘बदलापूर, हंटर, मांझी : द माउंटेन मॅन, कौन कितने पाणी मे, पार्च्ड आणि कबाली’ हे सिनेमे रिलिज झाले. मात्र यातील एकाही सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती कपिलच्या शोमध्ये गेली नाही. आता यामागचे नेमके कारण काय, हे मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. स्वरा भास्कर२०१३ पासून स्वराचे ‘रांझणा, मछली जल की रानी है, तनु वेड्स मनु रिर्टन्स आणि निल बटे सन्नाटा’ हे सिनेमे रिलिज झाले आहेत. मात्र यातील एकही सिनेमा प्रमोट करण्यासाठी ती कपिलच्या शोमध्ये पोहचली नाही. वास्तविक एप्रिल २०१६ मध्ये आलेला तिचा ‘निल बटे सन्नाटा’ हा सिनेमा कपिल शर्माचा शो लॉँच होण्याच्या एक दिवस अगोदरच रिलिज झाला होता. तेव्हा स्वरा म्हटली होती की, जर कपिलचा शो माझा सिनेमा रिलिज होण्याअगोदर लॉँच झाला असता तर मी नक्कीच त्याच्या शोमध्ये हजेरी लावली असती. अक्षय खन्नातब्बल चार वर्ष इंडस्ट्रीतून गायब झालेला अभिनेता अक्षय खन्नाने २०१६ मध्ये आलेल्या ‘ढिशूम’मध्ये पुन्हा बॉलिवूडमध्ये खलनायकाच्या भूमिकेत पर्दापण केले. या सिनेमाची संपूर्ण टीम त्यावेळी कपिलच्या शोमध्ये प्रमोशनसाठी आली होती. मात्र अक्षयने शोमध्ये येणे टाळले. सिनेमात त्याची भूमिका महत्त्वाची होती.