Join us

'अजूनही विश्वास बसत नाही की…', अक्षय कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 16:11 IST

Akshay Kumar:अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. पण यादरम्यान त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. पण यादरम्यान त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. अक्षय कुमारचा मराठमोळा हेअर स्टायलिस्ट मिलन जाधव यांचे आज निधन झाले आहे. अक्षयने मिलन जाधव यांच्याबरोबर फोटो शेअर करत दुःख व्यक्त केल.

अक्षय कुमार याने मिलन जाधव यांच्याबरोबर फोटो शेअर करत लिहिले की, उत्तम हेअरस्टाइल आणि तुझ्या हास्याने तू प्रचंड गर्दीतही उठून दिसत होतास. माझा एक केसही इकडे-तिकडे होणार नाही याची पुरेपूर तू काळजी घेतलीस. सेटवरील ते आयुष्य, १५ वर्षांहून अधिक काळ माझा हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करणारा मिलन जाधव. अजूनही विश्वास बसत नाही की तू आम्हाला सोडून गेला आहेस. मिलानो मला तुझी नेहमीच आठवण येत राहिल. ओम शांती.

मिलन जाधव यांचे निधन कशामुळे झाले याबाबत अजूनही कोणतीच माहिती समोर आलेली नाही.  अक्षय कुमार व्यतिरिक्त बॉलिवूडच्या इतर कलाकार मंडळींसाठी देखील मिलन यांनी काम केले होते. अक्षयसोबत मिलन इतर कलाकार मंडळींचे लाडके होते. अक्षय कुमारने पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी मिलन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनिल कपूर यांनी लिहिले की, अक्षय खरंच खूप दुःखद बातमी. मिलन यांच्या जवळच्या व्यक्तींच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे.

टॅग्स :अक्षय कुमार