श्रीनगर - बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सध्या ग्राऊंड झीरो चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे आहे. तिथे त्याच्यावर काही लोकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार काश्मीरमधील पहलगामपासूव काही अंतरावर चित्रिकरण संपवल्यानंतर इम्रान हाश्मी पहलगाममधील मेन मार्केटमध्ये गेला होता. तिथे त्याच्यावर दगडफेक करण्यात आली. इम्रानसोबत असलेल्या अन्य लोकांवरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीनगरमधील एसपी कॉलेजमध्ये इम्रान खानने चित्रिकरण केलं. तो जेव्हा चित्रिकरण संपवून बाहेर पडला तेव्हा त्याची वाट पाहत असलेल्या फॅन्सकडे त्याने पाहिलं देखील नाही. त्यामुळे लोक नाराज झाले. एका फॅन्सने सांगितले की, आम्ही इम्रान हाश्मीला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी उभे होतो. मात्र इम्रानने आमच्याकडे पाहिलंदेखील नाही. दरम्यान, या दगडफेकीप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
ग्राऊंड झीरो चित्रपटाचं चित्रिकरण तेजस देऊस्कर करत आहेत. या चित्रपटामध्ये इम्रान हाश्मीसोबत सई ताम्हणकर आणि झोया हुसेन या मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटासह इतरही काही चित्रपटांमध्येही इम्रान हाश्मी दिसणार आहे. त्यात अक्षय कुमारच्या सेल्फी या चित्रपटाचा समावेश आहे. त्याशिवाय सलमान खानच्या टायगर ३ या चित्रपटामध्येही इम्रान हाश्मी दिसणार आहे.