Join us

या प्रसिद्ध गायिकेच्या मुलीचा झाला साखरपुडा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 6:45 AM

डिसेंबरमध्ये सगळीकडे चर्चा होती क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची याच दरम्यान बॉलिवूडमधील गायिका अलका याज्ञिक यांच्या ...

डिसेंबरमध्ये सगळीकडे चर्चा होती क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची याच दरम्यान बॉलिवूडमधील गायिका अलका याज्ञिक यांच्या मुलीचासुद्धा साखरपुडा झाला आहे. 27 वर्षीय सायशा कपूरने आपला बॉयफ्रेंड अमित देसाईसोबत साखरपुडा केला आहे. याआधी सायशाने इंडियन आयडॉल फेम राहुल वैद्यासुद्धा डेट केले आहे. मात्र दोघांनी आपले नातं कधीच स्वीकारले नाही. सायशा 27 वर्षांची आहे ती अंधेरीत स्थित Boveda Bristro या रेस्तराँची को-ओनर आहे. हे हे रेस्तराँ सायशा तिच्या एका बालपणीच्या मित्रासोबत चालवते. अनेक हॉटेल मॅनेजमेंट कंपनीसोबत सायशा जुळली आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंध असूनदेखील सायशाने या इंडस्ट्रीत करिअर बनवले नाही. सायशाने लंडन स्कूल ऑफ मार्केटिंगमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. सायशाने ही अभिनयात करिअर करण्याच्या दृष्टीने फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता, पण हे जग  आपल्यासाठी नसल्याचे तिच्या लगेच लक्षात आले आणि तिने हॉटेल इंटस्ट्रीत करिअर करायचे ठरवले. आईप्रमाणे सायशाने ही संगीताचे शिक्षण घेतले आहे मात्र ती गाण्यातही फारकाळ रमली नाही.  ALSO READ :  OMG! ​या कारणामुळे अलका याज्ञिकने आमिर खानला काढले होते खोलीबाहेरअलकाचे लग्न १९८९ मध्ये नीरज कपूर सोबत झाले होते. नीरज हा एक प्रसिद्ध बिझनेसमन आहे. अलकाचे पती नीरज हे त्यांच्या कामानिमित्त शिलाँग येथे असतात. त्यांचा संपूर्ण व्यवसाय हा शिलाँग मध्ये आहे तर अलका याज्ञिक अधिकाधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गात असल्याने तिचे रेकॉर्डिंग हे मुंबईत असते. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तर ती तिच्या कामात प्रचंड व्यग्र होती. नव्वदीच्या दशकात तर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला अलकाचा आवाज ऐकायला मिळाला. त्यामुळे त्याकाळात आठवड्यातून चार-पाच दिवस तरी तिचे गाण्याचे रेकॉर्डिंग असायचे. त्यामुळे अलकाला मुंबईत राहाण्याशिवाय पर्याय नव्हता. अलकाचे नवीन लग्न झाल्यानंतर देखील ती मुंबईत आणि नीरज शिलाँगमध्ये असेच असायचे. अलकाला रेकॉर्डिंगमधून वेळ मिळाला की, ती शिलाँगला जात असे तर नीरज यांना त्यांच्या कामातून वेळ मिळाल्यास ते मुंबईला येत असत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या दोघांच्या कामामुळे असेच सुरू आहे. त्यांची मुलगी सायशा देखील आता मोठी झाली आहे.