Join us

एका बिन लग्नाची गोष्ट..! मलायका अरोराला पुन्हा बनायचंय आई, अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाबाबत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 10:20 IST

मलायकाला वयाच्या 46व्या वर्षातही पुन्हा आई बनण्याची इच्छा आहे.

बॉलिवूडमधील बरेचसे कपल्सना चर्चेत रहायला फार आवडते. मात्र अर्जुन कपूरमलायका अरोरा ही जोडी वारंवार चर्चेत येत असते. वयात मोठे अंतर असतानाही त्या दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे. त्यामुळे सगळेच त्यांच्या लग्नाच्या वृत्ताची बातमी ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु अद्याप त्यांनी लग्नाबाबत विचार केला नाही. मलायका लग्नाच्या आधीच मुलांबाबत विचार करते आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत असे काही सांगितले ज्यावरून हे स्पष्ट झाले की ती पुन्हा लग्नासाठी तयार आहे.

मलायका व अर्जुन यांच्या वयात दहा वर्षांचे अंतर आहे. तसं तर मलायकाला वयाच्या 46व्या वर्षातही आई बनण्याची आहे इच्छा. मलायका स्वतः म्हणाली की, ती अर्जुन कपूरसोबत एक बेबी प्लान नक्की करणार आहे. तिने लग्न कधी करणार हे सांगितले नाही. पण अर्जुन कपूरसोबत लग्न करणार आणि बेबी प्लान करणार हे नक्की.

मलायका अरोराने मुलाखतीत लग्नाबाबत सांगितले की, आम्ही आमच्या नात्यात एकावेळेला एकच पाऊल पुढे टाकत आहोत. लग्नाबद्दल आता काहीही सांगू शकत नाही. पण आगामी काळात जर कोणता निर्णय घेतला तर सगळ्यांना नक्की सांगू.

तर अर्जुन कपूरने एका मुलाखतीत लग्नाबद्दल सांगितले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, मी माझ्या पर्सनल व प्रोफेशनल लाइफमध्ये खूप खूश आहे. मी गुपचूप लग्न करून माझ्या चाहत्यांना हैराण करणार नाही. तर जेव्हा लग्न करायचे ठरवेन त्यावेळी याबद्दल सांगेन.

मलायका व अर्जुनच्या नात्याला त्यांच्या कुटुंबांकडून परवानगी मिळाली आहे. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची बातमी ऐकण्यासाठी आतुर आहेत.

 

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा