Join us

कोण आहे जसवंत सिंग गिल? अक्षय कुमार प्रेरणा देणाऱ्या रीयल लाईफ हीरोची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 12:59 PM

अभियंते जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर आधारित  चित्रपटात आपल्याला अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अक्षय कुमार लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. अभियंते जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर आधारित  चित्रपटात आपल्याला अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सर्वांनाच अक्षय कुमारच्या  'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत बचाव' या नव्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता लागली आहे. ज्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बनत आहे, त्या जसवंत सिंग गिल यांना रियल लाईफ हीरो असे संबोधले जाते. 

जसवंत सिंग यांनी 1989 मध्ये जसवंत यांनी जमिनीखाली 350 फूट अडकलेल्या 65 खाण कामगारांना वाचवले होते. ही घटना बिहारच्या रानीगंजमध्ये घडली, ज्याला मिशन रानीगंज म्हणूनही ओळखले जाते. राणीगंजच्या 104 फूट खोल खाणीत 232 मजूर काम करत होते. रात्री खाणीत पाणी शिरू लागले. तेव्हा कोळसा काढण्याच्या ट्रॉलीच्या मदतीने 161 मजूर बाहेर आले, मात्र 71 मजूर खाली अडकले होते.

गिल यांनी स्टील कॅप्सूल स्ट्रक्चरद्वारे कामगारांना बाहेर काढण्याची योजना आखली. खाणीच्या एका बाजूला 22 इंच व्यासाचे खिंडार करण्यात आले. या कॅप्सूल सारख्या रचनेत माणसाला जमिनीखाली जायचे होते, पण जमिनीखाली कोण जाणार हा प्रश्न होता. अशा परिस्थितीत गिल स्वत: जमिनीखाली जाण्यास तयार होते. गिल यांनी 6 तासांत एक-एक करून 65 लोकांना खाणीतून बाहेर काढले. शेवटच्या माणसाला घेऊन गिल बाहेर आले, तेव्हा उरलेल्या 6 जणांना वाचवू शकलो नाही असे म्हणताना त्यांना रडू कोसळले. या शोर्याबद्दल त्यांना कॅप्सूल मॅन म्हणूनही ओळखले जाते. 

भारत सरकारने त्यांना सर्वोत्कृष्ट जीवन बचत पदक (नागरी शौर्य) आणि लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्यांचे नाव नोंदवले गेले आहे. शिवाय मजिठा रोडवरील चौकाला अभियंता जसवंत सिंग गिल यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या आयुष्यावरील अक्षय कुमारचा हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 6 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारसिनेमाबॉलिवूड