Join us

'भारत हैं हम' चा ट्रेलर लाँच; अ‍ॅनिमेटेड स्वरुपात पाहायला मिळणार स्वातंत्र्य सैनिकांची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 16:59 IST

देशासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित 'भारत हैं हम' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

वर्षानुवर्षे लढा दिल्यानंतर 15 ऑगस्ट 1997 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. या लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काहींना जीवही गमवावा लागला. देशासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित 'भारत हैं हम' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी (11 ऑक्टोबर) व 'भारत हैं हम' अ‍ॅनिमेटेड सीरिजचा ट्रेलर लॉन्च केला.  2 मिनिट 13 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा लढा आणि त्यांच्या बलिदानापर्यंतची झलक दाखवण्यात आली आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांविरुद्ध बंड करून आपला देश कसा स्वतंत्र केला, हे या छोट्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता दुरदर्शनवरील सर्व चॅनल्स, नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडीओवर या सीरिजचं प्रसारण होणार आहे. हिंदी, इंग्रजीसह बारा भारतीय भाषांमध्ये तसेच सात आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. मुंजाल श्रॉफ आणि तिलक शेट्टी यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसिनेमाटेलिव्हिजनभारत