Join us  

'तुंबाड'च्या सेटवर घडल्या विचित्र घटना, थांबवावं लागलं शूटिंग, सोहम शाहने सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 3:18 PM

Tumbad Movie : हॉरर चित्रपट 'तुंबाड' पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. री-रिलीजमध्ये सोहम शाह अभिनीत या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे.

हॉरर चित्रपट 'तुंबाड' (Tumbad Movie) पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. री-रिलीजमध्ये सोहम शाह अभिनीत या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट हॉरर चित्रपटाबद्दल प्रत्येकजण बोलत आहे. अलिकडेच सोहम शाहने तुंबाडच्या शूटिंगदरम्यान एक धक्कादायक घटना सांगितली आहे, जेव्हा त्याला सेटवर विचित्र घटना घडताना जाणवल्या होत्या. ज्यामुळे शूटिंग मध्येच थांबवावे लागले होते. 

तुंबाड या चित्रपटाचे शूटिंग आम्ही ६ वर्षांत पूर्ण करू शकलो. जेव्हा आम्ही त्याचे शूटिंग करत होतो तेव्हा मला तिथे काहीतरी विचित्र वाटले. खरं तर, चित्रपटात दाखवलेल्या किल्ल्याच्या बाहेर, त्या गावातील लोक रोज ताटात जेवण देत आणि दरवाज्याबाहेर ठेवत. हे काही दिवस माझ्या लक्षात आले आणि मग मी त्यांना थांबवले आणि सांगितले की हे सर्व येथे करू नका. पण यानंतर खरा खेळ सुरू झाला, शूटिंगदरम्यान रोज काहीतरी चूक होऊ लागली. कधी सेटवरचे लाइट तुटायची तर कधी कुणी जखमी व्हायचे. त्यामुळे शूटिंग मध्येच थांबवावे लागले. मग मी गावकऱ्यांना पुन्हा जेवण ठेवायला सांगितले. तेव्हा सगळे सुरळीत चालू होते, हा अनुभव माझ्यासाठी खूपच भीतीदायक होता.

'तुंबाड'ला मिळतेय चाहत्यांची पसंतीतुंबाडच्या पुन्हा रिलीजची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या आठवड्यात १३ सप्टेंबर रोजी दिग्दर्शक अनिल राही बर्बे दिग्दर्शित 'तुंबाड' चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंती बनला आहे.