Join us

एका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 9:09 AM

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं एक कपल अखेर लग्नबंधनात अडकलं आहे. हे लग्न थोडं हटके होतं. कारण नव-या मुलाचं ...

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं एक कपल अखेर लग्नबंधनात अडकलं आहे. हे लग्न थोडं हटके होतं. कारण नव-या मुलाचं वय आहे ५२ वर्षे तर नवरीचे वय २७ वर्षे. म्हणजे दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही अखेर हे कपल रेशीमगाठीत अडकले आहे. हे कपल म्हणजे मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर. अलिबागमध्ये मिलिंद आणि अंकिताचा विवाहसोहळा कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पार पडला. दोन दिवसांपूर्वी आलेल्या ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत दोघेही रेशीमगाठीत अडकलेत. या लग्न सोहळ्याचे फोटो समोर आले असून यांत नवदाम्पत्य भलतेच खूश असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय मिलिंद आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. मागील दीड वर्षांपासून मिलिंद अंकिताला डेट करत होता. मात्र दोन तीन दिवसांपूर्वी लॉटरीच्या पैशांमुळे अंकिता मिलिंदचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते.मात्र त्या निव्वळ अफवा असल्याचे समोर आले असून दोघांनीही लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे.सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे. या नवदाम्पत्यला नांदा सौख्य भरे अशा शुभेच्छा….(Also Read:मिलींद सोमणची प्रेयसी होती ही मॉडेल,'त्या' फोटोशूटमुळे आले होते चर्चेत)cnxoldfiles/a>अंकिता गुवाहाटीची राहणारी आहे.२०१३ मध्ये ती एअर एशियाच्या केबिन क्रूचा भाग होती.मिलिंद एक बॉलिवूड अभिनेता असण्याबरोबर मॉडेलही आहे. ब-याचशा मॉडलिंगशी संबंधित शोमध्ये त्याने परीक्षकाची भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर मिलिंद त्याच्या फिटनेसविषयीदेखील प्रचंड जागरूक असून,त्याने जगभरातील ब-याचशा मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला आहे.अंकितानेही २०१५ मध्ये मिलिंदसोबत १० हजार कि.मी.ची मॅराथॉन पूर्ण केली होती.मिलिंद प्रत्येक पोस्टमध्ये तिचा उल्लेख श्रीमती असा करतो. काही महिन्यांपूर्वीच मिलिंद अंकिताच्या गुवाहाटी येथील घरी गेला होता.अंकिताच्या भाच्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तो सहभागी झाला होता.याच निमित्ताने मिलिंद अंकिताच्या पालकांना भेटला आणि अंकिताशी लग्न करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता.आधी अंकिताचे पालक वयाच्या अंतरावरून या लग्नासाठी राजी नव्हते.पण मिलिंदला प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांनी या लग्नाला होकार दिला होता.