Join us

"आधार कार्डचा फोटो अपलोड कर", चाहत्याची मजेशीर कमेंट, श्रद्धा कपूर रिप्लाय देत म्हणाली- "तुम्हाला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 13:26 IST

Shraddha Kapoor : श्रद्धा चाहत्यांच्या प्रश्नांनाही अनेकदा मजेशीर पद्धतीने उत्तरं देताना दिसते. आतादेखील चाहत्याच्या कमेंटवर श्रद्धाने रिप्लाय केला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या 'स्त्री २' सिनेमामुळे चर्चेत आहे. श्रद्धाचा हा हॉरर सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. श्रद्धा अभिनयाबरोबरच तिच्या मजेशीर स्वभावासाठीही ओळखली जाते. तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. चाहत्यांच्या प्रश्नांनाही अनेकदा श्रद्धा मजेशीर पद्धतीने उत्तरं देताना दिसते. आतादेखील चाहत्याच्या कमेंटवर श्रद्धाने रिप्लाय केला आहे. 

श्रद्धाने 'स्त्री २' सिनेमाबाबत एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवर केली आहे. स्त्री सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शकासोबत श्रद्धाने फोटो पोस्ट केला आहे. "सहा वर्ष जुने फोटो...पहिल्या स्त्री सिनेमाच्या शूटिंगदरम्यान 'स्त्री' आणि 'स्त्री २' सिनेमाचे सुपर डुपर ब्लॉकबस्टर निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याबरोबर...थँक्यू दिनो आणि अमर मला कमाल, बेमिसाल आणि लाजवाब स्त्री सिनेमांमध्ये संधी दिल्याबद्दल", असं श्रद्धाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

एका चाहत्याने कमेंट करत श्रद्धाला तिच्या आधार कार्डचा फोटो अपलोड करायला सांगितला आहे. "तुझ्या आधार कार्डचा फोटो अपलोड कर", अशी मजेशीर कमेंट चाहत्याने केली आहे. चाहत्याच्या या कमेंटवर श्रद्धाने रिप्लाय केला आहे. "त्यात मी एवढी सुंदर दिसतेय की तुम्हाला सहनच होणार नाही", असं श्रद्धाने म्हटलं आहे. 

दरम्यान, राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर रोज कोटींची कमाई करत आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत देशात ४४० कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा ५०० कोटींचा गल्ला पार करणार आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरसेलिब्रिटी