Join us

Video: तमन्ना भाटियाच्या अदांवर 'चंदेरी'वासी फिदा! 'स्त्री २' मधलं 'आज की रात' हे अफलातून गाणं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 18:29 IST

तमन्ना भाटियावर चित्रित झालेलं 'स्त्री २' मधलं पहिलं गाणं रिलीज. या गाण्यात तमन्नाचा भन्नाट नृत्याविष्कार दिसतोय (tamannah bhatia, stree 2)

पॅन इंडियाची स्टार तमन्ना भाटिया सध्या अनेक हिट चित्रपटांमध्ये तिच्या अभिनय कौशल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच तमन्ना कुशल नृत्यांगना आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. तमन्नाने काही महिन्यापूर्वी रिलीज झालेल्या रजनीकांत स्टारर 'जेलर' चित्रपटामधील 'कावला' गाण्यात किंवा 'अरनमानाई ४' मधील 'अचाचो' गाण्यात तिच्या डान्सचा आविष्कार सर्वांना दाखवला. आता तमन्ना 'स्त्री २' मध्ये तिच्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज झाली आहे.

'स्त्री २'मधील तमन्नाचं नवीन गाणं रिलीज

'स्त्री २' चित्रपटातील पहिलं गाणं आज रिलीज झालंय. ‘आज की रात’ असं या गाण्याचं नाव असून गाण्यात तमन्ना तिच्या नृत्याने चित्रपटातील हॉटनेस वाढवताना दिसतेय. सचिन-जिगर या डायनॅमिक जोडीने हे गाणं संगीतबद्ध केले आहे. विजय गांगुलीने तमन्नाच्या अफलातून डान्सची कोरिओग्राफी केलीय. सोशल मीडियावर गाणं रिलीज होताच प्रेक्षकांनी तमन्नाचं कौतुक केलं आहे. गाण्यात तमन्नासोबत चित्रपटातील 'चंदेरी'वासी अर्थात राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी थिरकताना दिसत आहेत.

'स्त्री २' कधी रिलीज होणार?

१५ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या 'स्त्री २' मधल्या या पहिल्या गाण्याने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, श्रद्धा कपूर असलेल्या 'स्त्री २' या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 'बाहुबली' फेम अभिनेत्रीला 'ओडेला २', 'वेदा' आणि ओटीटी प्रोजेक्ट 'डेअरिंग पार्टनर्स'मध्ये बघायला तिचे चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :तमन्ना भाटियाराजकुमार रावपंकज त्रिपाठीअपारशक्ती खुराना