Join us  

राजकुमार राव-श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' पाहायचा करताय विचार? Review वाचून घ्या निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 2:30 PM

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' सिनेमा उद्या रिलीज होतोय. या सिनेमाचा पहिला Review समोर आलाय (rajkumar rao, shraddha kapoor, stree 2)

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर या दोघांची भूमिका असलेला 'स्त्री २' हा सिनेमा उद्या १५ ऑगस्टच्या मुहुर्तावर रिलीज होतोय. 'स्त्री २' या सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. अखेर उद्या हा सिनेमा रिलीज होणार आहे. २०१८ साली आलेल्या 'स्त्री' या सुपरहिट सिनेमाचा हा सिक्वेल आहे. चंदेरी गावातल्या लोकांना 'स्त्री'ने पहिल्या भागात घाबरवलं. आता दुसऱ्या भागात 'सरकटे का आतंक' या नावाने 'स्त्री २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्त्री २' पाहायचा तुम्हीही विचार करत असाल तर पहिला Review समोर आलाय त्यावर नजर मारु शकता.

'स्त्री २'चा पहिला Review आला समोर

अभिनेता, लेखक आणि मॉडेल असलेल्या कुलदीपने इन्स्टाग्रामवर 'स्त्री २' विषयीचा पहिला review शेअर केलाय. कुलदीप लिहितो, "माय गॉड. काय शानदार सिनेमा आहे. हा सिनेमा पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. 4/5 स्टार. सिनेमाची स्क्रिप्ट शानदार आहे. या सिनेमात निखळ विनोद पेरलेले संवाद आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळतो. बॉलिवूडमधील बेस्ट सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. एक असा हॉरर जॉनर आहे ज्याला बॉलिवूडमधील दिग्दर्शकांनी अजून हाताळलं नाहीय."

 

दिग्दर्शनाचंही केलं कौतुक

कुलदीप पुढे लिहितात, "अमर कौशिक यांच्या कमाल दिग्दर्शनाला हॅट्स ऑफ. सरकटा जेव्हाही सिनेमात दिसेल तेव्हा तुमची घाबरगुंडी उडेल. याशिवाय तुम्ही खळखळून हसाल ही गॅरंटी. हा सिनेमा म्हणजे फुल ऑन रोलर कोस्टर राईड आहे." 'स्त्री', 'भेडीया', 'मुंज्या' या सिनेमांनंतर 'स्त्री २' या युनिव्हर्सला पुढे घेऊन जाणार आहे. या सिनेमात राजकुमार रावअपारशक्ती खुरानाश्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार पुन्हा एकदा धमाल करताना दिसणार आहेत. असंही सांगण्यात येतंय की, अक्षय कुमार या सिनेमात कॅमिओ करणार आहे. आता या बातमीत किती तथ्य आहे हे सिनेमा आल्यावरच कळेल. 'स्त्री २' सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

टॅग्स :राजकुमार रावश्रद्धा कपूरअपारशक्ती खुराना