Join us  

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकलं मागे, पण कशात वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 4:49 PM

श्रद्धा तिच्या साधेपणामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरते.

Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीचा 'स्त्री 2' हा चित्रपट धमाका करताना दिसतोय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त असा प्रतिसाद मिळालाय. श्रद्धा कपूर तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. कोल्हापूरचे मराठी संस्कार जपत, कपूरांच्या घरची ही मराठमोळी लेक हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चा ठसा उमटवते आहे. श्रद्धा कपूरचा मोठा चाहतावर्ग आहे. आता श्रद्धाने आणखी एक रेकॉर्ड रचला आहे. तिने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागे टाकलं आहे. 

लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींमध्ये श्रद्धा तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. तिनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे टाकलं आहे. इन्स्टाग्रामवरील लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींमध्ये क्रिकेटपटू विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.  तर दुसऱ्या क्रमांकावर बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा आहे. तर आता तिसऱ्या क्रमांकावर श्रद्धा कपूर आहे. श्रद्धाचे आता इन्स्टाग्रामवर तब्बल ९१.५ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ९१.३ फॉलोअर्स आहेत. हे आकडे २१ ऑगस्ट पर्यंतचे आहेत.

श्रद्धा ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये एक आहे.  तिच्यातील हा साधेपणा सुद्धा चाहत्यांना मोहून टाकत असतो. अभिनेत्री अनेकदा त्यांच्या क्यूटनेसमुळे मीडियामध्ये लोकांचे लक्ष वेधून घेतात.  विशेष बाब म्हणजे, ती शुद्ध मराठीत बोलते. अनेक ठिकाणी ती आवर्जुन मराठीतच संवाद साधताना दिसून येते.  श्रद्धाचे चाहते जगभरात आहेत, ती कुठेही गेली तरी ती तिच्या चाहत्यांना नक्कीच भेट देते. 

 

टॅग्स :श्रद्धा कपूरविराट कोहलीनरेंद्र मोदीप्रियंका चोप्राइन्स्टाग्रामसोशल मीडियासेलिब्रिटीबॉलिवूड