Join us  

'स्त्री' अन् 'भेडिया' एकत्र! 'खूबसूरत' गाण्यात दिसणार वरुण धवन-श्रद्धा कपूरची रोमँटिक केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 4:38 PM

लाल साडीत श्रद्धाचं सौंदर्य तर बघा!

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार रावच्या आगामी 'स्त्री 2' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलर आल्यापासूनच उत्सुकता ताणली गेली आहे. 2018 साली आलेला 'स्त्री' हा हॉरर कॉमेडी सिनेमा सुपरहिट झाला होता. मॅडॉक फिल्म्सने यानंतर आणखी काही हॉरर कॉमेडी सिनेमे आणले. वरुण धवनचा (Varun Dhawan) 'भेडिया' हा त्यापैकीच एक. आता आगामी 'स्त्री 2' मध्ये वरुण धवनही भेडियाच्या रुपात कॅमिओ करणार आहे. श्रद्धा आणि वरुणच्या रोमँटिक गाण्याची झलक नुकतीच समोर आली आहे.

मॅडॉक फिल्म्सने त्यांचं वेगळं हॉरर युनिव्हर्स बनवलं आहे. यामध्ये स्त्री, भेडिया, मुंज्या यांचा समावेश आहे. आगामी 'स्त्री 2' मध्ये भेडियाच्या रुपात वरुण धवनचीही झलक दिसणार आहे. स्त्री 2 मध्ये श्रद्धाच्या लूकचीही चर्चा आहे. लांब केस, लाला साडी असा तिचा लूक आहे. प्रमोशनसाठीही श्रद्धा अशाच लूकमध्ये दिसते. आता नुकतंच वरुण धवन आणि श्रद्धा यांच्यावर चित्रीत झालेल्या रोमँटिक गाण्याची झलक समोर आली आहे. 'खूबसूरत' असं गाण्याचं नाव असून उद्या हे गाणं रिलीज होत आहे. 'इस स्त्री की खूबसूरती का कौन है नया आशिक?' असं कॅप्शनने वरुणने दिलं आहे. गाण्यात श्रद्धा लाल साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तर वरुण तिला जवळ खेचत रोमान्स करताना दिसतोय. 'कुछ कहानियो को समझा नही जाता, सिर्फ महसूस किया जाता है' असा डायलॉग श्रद्धा म्हणते. तर तिकडून भेडियाचा आवाज ऐकायला येतो आणि वरुण धवनची एन्ट्री होते. 

स्त्री आणि भेडियाचं हे कोलॅबोरेशन पाहून चाहते आणखी आतुर झाले आहेत. 15 ऑगस्टला 'स्त्री 2' प्रदर्शित होतोय. यामध्ये राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांचीही भूमिका आहे. शिवाय तमन्ना भाटियाचाही कॅमिओ पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे वरुण धवन आण िश्रद्धा कपूरने 'एबीसीडी' सिनेमात एकत्र काम केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांची केमिस्ट्री स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूरवरूण धवनबॉलिवूडसिनेमा