टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया स्टारर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून काही चाहते कमालीचे क्रेजी झालेत तर काही तितकेच निराश. होय, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे.ट्रेलरमधील टायगर श्रॉफची ‘बागी’ स्टाईल पाहून सोशल मीडियाचे काही युजर्स उत्साहित आहेत. तर काहींनी या ट्रेलरला अगदी काठावर पास केले आहे. काही युजर्सला ‘दिन तेरा है, साल मेरा होगा’ हा डायलॉग प्रचंड आवडला. तर काहींना अजिबात आवडला नाही. अनेकांनी ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ची ‘स्टुडंट ऑफ द ईअर’शी तुलना केली. इतकेच नाही तर काहींनी या ट्रेलरची तुलना करत आमिर खानच्या ‘जो जीता वही सिकंदर’चे गोडवे गायले.
‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’चा ट्रेलर काठावर पास! कुणी म्हटले झक्कास तर कुणी बकवास!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 14:07 IST
टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया स्टारर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून काही चाहते कमालीचे क्रेजी झालेत तर काही तितकेच निराश. होय, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे.
‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’चा ट्रेलर काठावर पास! कुणी म्हटले झक्कास तर कुणी बकवास!!
ठळक मुद्देचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोघी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.