Join us  

सुहाना खान-अगस्त्य नंदाची नाईट क्लबमध्ये पार्टी, शाहरुखच्या लेकीचा बिग बींच्या नातवासोबतचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 12:43 PM

सुहाना आणि अगस्त्य नंदाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ते एकमेकांबरोबर बोलताना आणि पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत.

बॉलिवूड सेलिब्रिटींचे पार्टीमधील व्हिडिओ व्हायरल होत असतात. सेलिब्रिटींच्या डेटिंगच्या चर्चाही रंगताना दिसतात. सध्या बी टाऊनमध्ये स्टारकिड कपलची चर्चा होत आहे. शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये आणि पार्टीमध्येही अगस्त्य आणि सुहानाला एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. आतादेखील त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. 

सुहाना आणि अगस्त्य नंदाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ते एकमेकांबरोबर बोलताना आणि पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. या व्हिडिओत सुहानाने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि जीन्स घातल्याचं दिसत आहे. तर अगस्त्य नंदा काळ्या रंगाच्या शर्टमध्ये हँडसम दिसत आहे. नाईट क्लबमध्ये पार्टी करताना अगस्त्य आणि सुहानाला स्पॉट करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या सुहाना लंडनमध्ये आहे. मित्राच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी ते एकत्र आले होते. या व्हिडिओत निसा देवगणही दिसत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सुहाना आणि अगस्त्य एकमेकांना डेट करत आहेत. 'द आर्चीज' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे. पण, याबाबत अद्याप सुहाना किंवा अगस्त्य यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. अगस्त्य हा अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चनचा मुलगा आहे. 'द आर्चीज' सिनेमात अगस्त्य आणि सुहानाने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. 

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खानअमिताभ बच्चनसेलिब्रिटी