Join us

Suhana Khan Saree Look: सुहाना खानला Diwali Party मध्ये साडीत पाहून शाहरूख, गौरीने केल्या खास कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 10:10 PM

तुम्ही पाहिलात का सुहानाचा 'साडी लूक'

Shahrukh Khan on Suhana Diwali Party Look: प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​याने त्याच्या वांद्रे येथील घरी दिवाळीपूर्वीची पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत मनीषने बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींना आमंत्रित केले होते. या पार्टीत केवळ सेलेब्सच्या लूकचीच नाही तर स्टार किड्सच्या लूकचीही खूप चर्चा झाली. त्याच वेळी 'बॉलिवूडचा किंग' शाहरूख खानची लेक सुहाना खानचा गोल्डन साडीतील लूक चांगलाच चर्चेत राहिला. तिच्या या फोटोवर शाहरुख खाननेही कमेंट केली. सोशल मीडियावर वडील आणि मुलीच्या या गप्पा मजेशीरपणे व्हायरल झाल्या. विशेष म्हणजे, गौरी खाननेही या दोघांच्या कमेंट्सवर स्वत: कमेंट केली.

सुहानाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून सुहानाने पिवळा हार्ट आयकॉन शेअर केला आहे. शाहरुख खान हे फोटो बघताच स्वत:ला रोखू शकला नाही. लाडक्या मुलीचे फोटो पाहून शाहरुखने कमेंट केली- 'तुम्ही जितक्या लवकर मोठे झालात, त्यावरून कळतंय की वेळ किती झटपट निघून गेली. खूप सुंदर आणि साडीत लेक खूपच सुंदर दिसतात.' सोबत लिहिले- 'ही साडी तू स्वतः नेसली आहेस का?' शाहरुखची ही कमेंट पाहून सुहानाने लिहिले- लव्ह यू... ही साडी मी नेसलेली नाही... आईने (गौरी खान) मला साडी नेसवली आहे. यानंतर गौरी खाननेही कमेंट केली- 'साडी ही कोणत्याही काळातच नेहमीच चांगली दिसते.'

दरम्यान, एकीकडे सुहाना खानच्या लूकची चर्चा होत असताना दुसरीकडे तिच्या पोस्टमुळे तिला ट्रोल करण्यात आले. मनीष मल्होत्राच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी सुहाना कारमधून खाली उतरताच ती पापाराझींच्या समोर आली. त्यावेळी साडीमध्ये तिला चालण्याची सवय नसल्याने ती जपून चालत होती. त्यावरून काहींना तिची चाल रोबोटसारखी असल्याचे म्हटत तिला ट्रोल केले. तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. पण असे असले तरी सुहाना खान तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे कायमच लाइमलाइटमध्ये राहते.

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खानगौरी खानइन्स्टाग्राम