Join us

"मी ब्रेकअप केलं", सुहाना खानची पोस्ट चर्चेत, श्वेता बच्चन कमेंट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 11:43 AM

सुहानाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने "माझ्याकडे एक बातमी आहे. मी ब्रेकअप केलं आहे", असं म्हटलं आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान कायमच चर्चेत असते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सुहानाही अभिनयात तिचं नशीब आजमावत आहे. पण, सध्या तिच्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे. सुहानाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने "माझ्याकडे एक बातमी आहे. मी ब्रेकअप केलं आहे", असं म्हटलं आहे. सुहानाच्या या पोस्टमुळे चर्चा रंगल्या आहेत. 

सुहानाचं नाव अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चनचा लेक अगस्त्य नंदाबरोबर जोडलं गेलं होतं. सुहाना आणि अगस्त्य नंदा यांच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. त्यामुळेच आता सुहानाच्या पोस्टने अगस्त्य नंदा आणि तिच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सुहाना आणि अगस्त्यमध्ये नेमकं काय बिनसलं? असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. पण, सुहानाने ही पोस्ट तिच्या डेटिंग लाइफबद्दल केलेली नाही. 

सुहानाने या पोस्टमधून एका साबणाची जाहिरात केली आहे. एका प्रसिद्ध साबणाच्या जाहिरातीत सुहाना झळकली आहे. त्यासाठीच तिने ही पोस्ट शेअर केली आहे. "माझ्याकडे एक बातमी आहे. मी ब्रेकअप केलं आहे...माझ्या साबणाबरोबर", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर श्वेता बच्चनेही कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. 

दरम्यान, सुहानाने झोया अख्तरच्या 'द आर्चिज'मधून अभिनयात पदार्पण केलं होतं. पण, हा सिनेमा प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही. आता सुहाना 'किंग' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक एक्शन-थ्रिलर सिनेमा असून सुजॉय घोष याचं दिग्दर्शन करत आहे. लंडनमध्ये या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. 

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान