Join us

वयाच्या १५व्या वर्षी शिक्षणासाठी विदेशात गेली सुहाना खान, तिथला अनुभव शेअर करत म्हणाली - 'काही काळासाठी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 18:46 IST

Suhana Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान (Suhana Khan) झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याचे शूटिंग संपताच सुहानाने आता जोरदार प्रमोशन सुरू केले आहे. दरम्यान, नुकतीच ती कोएल पुरी यांच्या 'क्लिअरली इनव्हिजिबल इन पॅरिस' या पुस्तकाच्या लाँच इव्हेंटमध्ये पोहोचली आणि या पुस्तकाचे लाँचिंग केले. या कार्यक्रमात सुहानाची आई गौरीही तिच्यासोबत उपस्थित होती. दरम्यान, सुहानाने सांगितले की, तिला हे पुस्तक खूप आवडले, कारण जेव्हा ती अभ्यासासाठी परदेशात गेली तेव्हा तिला काही काळ एकटेपणा जाणवला.

'क्लीअरली इनव्हिजिबल इन पॅरिस'बद्दल बोलताना सुहाना खान म्हणाली, 'मी स्वत:ला इमिग्रंट म्हणणार नाही, मी तिथे अभ्यासासाठी गेले होते. मी १५ वर्षांची असताना मी बोर्डिंग स्कूलसाठी घर सोडले. त्यामुळे मला वाटले की ते भीतीदायक होते आणि सांस्कृतिकदृष्ट्या माझ्यासाठी हा एक मोठा धक्का होता. मग मला तिथे घरपण यायला थोडा वेळ लागला. हे घरपण तिथल्या लोकांमुळे मिळाले. तिथल्या लोकांनी मला अदृश्य होण्यापासून वाचवले.

शाहरुखने केली पोस्ट गौरी खाननेही तिच्या ट्विटर अकाऊंटवर या बुक लॉन्च इव्हेंटचा एक व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे, जो शाहरुख खानने पुन्हा शेअर करत लिहिले, 'होय, तू बरोबर आहेस गौरी. आयुष्याचे हे पूर्ण वर्तुळ पूर्ण करण्यात आपली मुले उपयुक्त ठरत आहेत. तू तिन्ही मुलांना खूप छान शिकवलंस, प्रेम वाटायलाही शिकवलंस, पण त्यांना माझ्याकडून डिंपल मिळाले आहे. या कार्यक्रमात सुहानाने आपले मुद्दे अगदी व्यवस्थित मांडले आहेत.शाहरुख खान अनेकदा सुहाना खानचे कौतुक करताना दिसतो. दोन भावांमध्ये सुहाना खान ही एकुलती एक बहीण आहे, अशा परिस्थितीत तिला आई-वडिलांशिवाय भावांचंही तिला खूप प्रेम मिळतं.

टॅग्स :सुहाना खान