Join us

सुहाना खानच्या ‘मॅगझिन डेब्यू’ला आॅगस्टचा मुहूर्त! ‘या’ जगप्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकणार ‘किंगखान’ची लेक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 15:20 IST

 होय, लवकरच एका जगप्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरपेजवर सुहाना झळकणार आहे. म्हणजे, तिचा मॅगझिन डेब्यू ठरला आहे.

किंगखान शाहरूख खान व गौरी खान यांची लाडकी लेक सुहाना खान हिच्या बॉलिवूड डेब्यूकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. पण यादिशेने सुहानाने पहिले पाऊल टाकले आहे. होय, लवकरच एका जगप्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरपेजवर सुहाना झळकणार आहे. म्हणजे, तिचा मॅगझिन डेब्यू ठरला आहे आणि तिच्या या मॅगझिन डेब्यूला आॅगस्टचा मुहूर्त मिळाला आहे. अलीकडे एका अवार्ड शोमध्ये गौरी खान हिने याबाबतचे संकेत दिले होते. सुहानाने एका मॅगझिनसाठी शूट केले आहे. या वर्षातील माझ्यासाठीची ही सर्वात मोठी उत्साहवर्धक बातमी आहे, असे सुहानाच्या मॉमने यावेळी सांगितले होते. ही मॅगझिन कोणती, हे मात्र तिने गुलदस्त्यात ठेवले होते. पण आता त्याचाही खुलासा झाला आहे.होय, बॉलिवूडलाईफने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूख खान व गौरी खानची लेक जगप्रसिद्ध ‘वोग’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळणार आहे. ‘वोग’ मॅगझिनच्या आॅगस्ट महिन्याच्या अंकाच्या कव्हरपेजवर सुहानाचा स्टनिंग अवतार आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. नुकतेच सुहानाने या मॅगझिनसाठी फोटोशूट केले. यानिमित्ताने सुहानाची पहिली मुलाखतही आपल्याला वाचायला मिळणार आहे.काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर ‘वोग’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली होती. जान्हवीपाठोपाठ ही संधी सुहानाला मिळालीय. एकार्थाने यामाध्यमातून ग्लॅम वर्ल्डमध्ये तिची एन्ट्री होणार आहे. कदाचित यानंतर तिच्या बॉलिवूड डेब्यूचीही घोषणा होईन, कोण जाणो!तूर्तास सुहाना खान आपल्या कुटुंबासोबत बर्सिलोना येथे सुट्टी एन्जॉय करतेय.   सध्या बॉलिवूडच्या अनेक पार्टींमध्ये, कार्यक्रमात सुहाना  पाहायला मिळते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरदेखील ती खूपच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोव्हर्स आहेत.  करण जोहर आणि शाहरुखचे खास मैत्रीपूर्ण संबंध असल्याने करणच्या चित्रपटामधूनच सुहाना बॉलिवूडमध्ये एंट्री करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. सुहानाला अभिनेत्री व्हायचे असल्याचे, तिने काजोलकडून अभिनयाचे बारकावे शिकावे, अशी शाहरुखची इच्छा आहे. याबाबत खुद्द शाहरुखने एका मुलाखतीमध्ये माहिती दिली होती.