Join us

ड्रग्स प्रकरणावर गायक सुखविंदर सिंह यांची प्रतिक्रिया, 'बॉलिवूडसोबतच म्युझिक इंडस्ट्रीही होईल क्लीन अप'

By अमित इंगोले | Published: September 28, 2020 9:14 AM

सुखविंदर सिंह यांना आशा आहे की, बॉलिवूडमध्ये क्लीन अप होईल. सोबतच ते असंही म्हणाले की, पूर्ण बॉलिवूड ड्रग्सची नगरी आहे हा दावा पूर्णपणे निराधार आहे.

(Image Credit : wikibio.in)  

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार आवाजाने स्वत:चं नाणं खणखणीत वाजवाणारे प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी सुशांत सिंह राजपूत केसमधून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सुखविंदर सिंह यांना आशा आहे की, बॉलिवूडमध्ये क्लीन अप होईल. सोबतच ते असंही म्हणाले की, पूर्ण बॉलिवूड ड्रग्सची नगरी आहे हा दावा पूर्णपणे निराधार आहे.

सुखविंदर सिंह म्हणाले की, 'मला वाटतं की, लोकांनी या प्रकरणात बोलावं. आधी लोक मूड बनवण्यासाठी शौक करत होते. पण आता ती लहर निघून गेली, जी प्रत्येकाला त्रास देत आहे. जे लोक कलाकारांना इतका मान सन्मान देत होते, तेही हर्ट होत आहे. आणि जे कलाकार ड्रग्स घेत नव्हते तेही या प्रकरणात टार्गेट होत आहेत.

ते म्हणाले की, 'मला वाटतं गोष्टी आणखी बिघडतील आणि नंतर पुन्हा चांगल्या होत जातील. मला वाटं मीटू मुव्हमेंटनंतर लोक महिलांसोबत चांगलं वागू लागले आहेत. अशात आता जे लोक थोडं फार ड्रग घेत होते ते या चौकशीनंतर असं करणं सोडून देतील. केवळ बॉलिवूडच का? त्याशिवायही अनेक लोक असू शकतात. अनेक लोक म्युझिक इंडस्ट्रीमध्येही असू शकतात'.

सुखविंदर सिंह यांचं मत आहे की, सरकार फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधत नाहीय. असं असतं तर अनेक वर्षांआधीच असं झालं असतं. सुखविंदरने आशा व्यक्त केली की, जे लोक ड्रग्स घेत आहेत त्यांच्याऐवजी पेडलर्सवर जास्त फोकस करावा. कारण ते हेच लोक आहेत जे समाजात ड्रग्स पसरवतात आणि ते या प्रकरणात अधिक गुन्हेगार आहे.

सुखविंदर म्हणाले की, हे फारच दुर्देवी आहे की, लोक सोशल मीडियावर यावरून फार गंमत करत आहेत. या लोकांची काहीच आयडेंटिटी नाही आणि ते सेलेब्सवर निशाणा साधत आहेत. त्यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. बॉलिवूड याबाबतीत एक सॉफ्ट टार्गेट आहे. आमच्या फिल्म इंडस्ट्रीत इतके लोक आहे ज्यांनी देशाचं नाव मोठं केलं. अनेकजण प्रेरणास्थान आहेत. पण सोशल मीडियावर आणि काही चॅनल्सवर या स्टार्ससाठी वापरली जाणारी भाषा फारच मन दुखवणारी आहे.

हे पण वाचा :

ड्रग्ज कनेक्शनमध्ये आणखी बडी नावे समोर येणार; क्षितिजला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी

इतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे? जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण

‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव 

टॅग्स :बॉलिवूडअमली पदार्थ