अभिनेत्री मंदिरा बेदीचा (Mandira Bedi) पती आणि निर्माता-दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांनी गेल्या बुधवारी पहाटे जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. (Raj Kaushal death) त्यांच्या अकाली निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे. मंदिराचे अश्रू तर अद्यापही थांबत नाहीयेत. मृत्यूच्य दोन दिवसांपूर्वीच राज कौशल व मंदिरा दोघांनीही मित्रांसोबत पार्टी केली होती. बुधवारची रात्र राज यांच्यासाठी अतिशय कठीण होती. राज यांचा मित्र आणि संगीतकार सुलेमान मर्चंट (Sulaiman Merchant) यानं त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, ते सांगितलं आहे.
ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सुलेमान मर्चंटनं याबद्दल सांगितलं. त्यानं सांगितलं की, त्या रात्री हार्ट अटॅक आल्याची गोष्ट राजने मंदिराला सांगितली होती. मृत्यूच्या काही तास आधी तो थोडा अस्वस्थ होता. अॅसिडीटी झाल्याचे समजून त्यानं औषधं घेतली आणि झोपायला गेला. पण नंतर त्याचा त्रास वाढला. रात्री त्याला पुन्हा त्रास होऊ लागला. मला हार्ट अटॅक आलायं, असं त्यानं मंदिराला सांगितलं. त्याची अवस्था बघून मंदिरा घाबरली. तिनं लगेच आशीष चौधरीला कॉल गेला. तो सुद्धा लगेच मंदिराच्या घरी पोहोचला. मंदिरा व आशीष यांनी तातडीने राजला कारमध्ये बसवलं आणि लीलावती रूग्णालयाकडे निघाले. यादरम्यान राज बेशुद्ध झाला होता. पुढच्याच 5-10 मिनिटात राजच्या पल्स थांबल्याचे मंदिराला समजलं होतं. कदाचित वाटेतच राजचा मृत्यू झाला होता. रूग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी राजला मृत घोषीत केले.प्राप्त माहितीनुसार, राजला आधीपासून हृदयविकार होता. वयाच्या 30-32 व्या वर्षीच त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. पण यानंतर तो स्वत:ची अतिशय काळजी घेत होता. स्वत:ला जपत होता.
मी माझा मित्र गमावला...राज व माझी गेल्या 25 वर्षांपासूनची मैत्री होती. राज मुकूल आनंद यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करत होता, तेव्हापासून मी त्याला ओळखत होतो. महामारीदरम्यानही मी त्याला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो. सलीम व मी त्याचा पहिला सिनेमा ‘प्यार में कभी कभी’ ला म्युझिक दिलं होतं. पण आता मी माझा हा मित्र कायमचा गमावला आहे, असं सांगताना सुलेमान काही क्षण भावुक झाला होता.