ठळक मुद्देसुमन सध्या चार्टड अकाउंटची तयारी करत आहे. फेमिना मिस इंडिया 2019चा किताब जिंकल्यानंतर सुमन भावूक झाली.
राजस्थानच्या सुमन राव या २२ वर्षीय सुंदरीने फेमिना मिस इंडिया 2019 चा ताज जिंकत, आपले स्वप्न सत्यात उतरवले. 2018 ची मिस इंडिया अनुकृती दास हिने सुमनला ताज घातला. गेल्यावर्षी तमिळनाडूच्या अनुकृती दासने हा ताज जिंकला होता.सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडिअममध्ये फेमिना मिस इंडिया 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हुमा कुरेशी, चित्रंगदा सिंग, रेमो डिसूजा, विकी कौशल आणि आयुष शर्मा, मिस वर्ल्ड २०१८ वेनेसा पोंसे, शहाने पिकॉक, मुकेश छाबरा हे सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.
सुमन सध्या चार्टड अकाउंटची तयारी करत आहे. फेमिना मिस इंडिया 2019चा किताब जिंकल्यानंतर सुमन भावूक झाली. माझ्या आईवडिलांनी मला घडवले. त्यांच्याकडून मी खूप काही शिकले. मिस इंडिया 2019चा ताज जिंकणे ही माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे, असे ती म्हणाली.
गतवर्षी सुमन हा किताब जिंकण्यात असमर्थ ठरली होती. 2018 मध्ये ती फर्स्ट रनरअप ठरली होती. फेमिना मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर आता सुमन मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल. सुमन सोशल मीडियावर फार सक्रिय आहे.
फेमिना मिस इंडिया 2019 स्पर्धेत एकूण ३० स्पर्धक होत्या. यावेळी सुमनने मिस इंडियाचा किताब जिंकला. तर तेलंगनाची संजना विज उपविजेती ठरली. बिहारच्या श्रेया शंकरने मिस इंडिया यूनायटेड कॉन्टिनेंट 2019चा किताब जिंकला. छत्तीसगढच्या शिवानी जाधवने मिस ग्रँड इंडिया 2019 चा किताब जिंकला. करण जोहर, मनीष पॉल आणि माजी मिस इंडिया मानुषी छिल्लरने हा शो होस्ट केला.
पाहा, सुमन रावचे काही खास फोटो