Join us

अण्णाला जावयाचं भारी कौतुक! के एल राहुलला 'या' नावाने हाक मारतो सुनिल शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 18:47 IST

अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल जानेवारी 2023 मध्ये लग्नबंधनात अडकले होते.

बॉलिवूडचा अण्णा म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी. त्याची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल जानेवारी 2023 मध्ये लग्नबंधनात अडकले. दोघेही लवकरच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. सुनील शेट्टीचं जावायासोबत खूप घट्ट नातं आहे.  ते दोघेही अनेक विषयांवर गप्पा मारताना दिसतात. नुकतेच एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टी जावायाबद्दल भरभरून बोलला.  

 सासरे अन् जावई असं नातं असलं तरी सुनील शेट्टी हा केएल राहुलला मुलगाच मानतो. तो केएल राहुलला 'बाबा' या नावाने हाक मारतो. नुकतेच एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीने राहुलच्या ट्रोलिंगवर भाष्य केले. तो म्हणाला, 'जेव्हा कोणी केएल राहुलला ट्रोल करते. तेव्हा मला खूप वाईट वाटते. राहुलपेक्षा मला १०० पट जास्त त्रास होतो'.

पुढे तो म्हणाला, 'तरीसुद्धा तो मला नेहमी म्हणतो की तुम्ही त्याबद्दल प्रतिक्रिया देऊ नका. त्या ट्रोलिंगला मी माझ्या खेळीनेच उत्तर देईन. पण लोकांचा त्याच्यावर असलेला विश्वास, निवड समितीचा त्याच्यावर असलेला विश्वास, त्याच्या कर्णधाराने दाखवलेला विश्वास यातून सगळं स्पष्ट होते'. 

तर ईटाईम्सशी खास संवाद साधताना सुनील शेट्टी म्हणाला, 'जेव्हा तो मैदानावर खेळतो, तेव्हा मी खूप नर्व्हस होतो. मी कायम त्याच्या चांगल्यासाठी पार्थना करत असतो.  त्याच्या डोळ्यात बघून मला सहानुभूती आणि कौतुक वाटू लागतं. जेव्हा तुमचं मुलं हे वाईट काळातून जात असतं. तेव्हा त्याचा त्रास तुम्हालाही होतो'. 

टॅग्स :सुनील शेट्टीलोकेश राहुलबॉलिवूडअथिया शेट्टी