Join us

सुनील शेट्टीने लेकासोबत मुंबईत खरेदी केली नवी प्रॉपर्टी, किंमत आहे तब्बल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 10:49 AM

सुनील शेट्टीने लेक अहानसोबत मिळून मुंबईत नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. मुंबईतील वांद्रे येथे सुनील शेट्टी आणि अहानने मिळून ही प्रॉपर्टी खरेदी केल्याचं समजत आहे.

सुनील शेट्टी हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. विविधांगी भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली. ९०चं दशक गाजवणारा सुनील शेट्टी आजही प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतो. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बॉलिवूडचा अण्णा चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच सुनील शेट्टीने लेक अहानसोबत मिळून मुंबईत नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. 

मुंबईतील वांद्रे येथे सुनील शेट्टी आणि अहानने मिळून ही प्रॉपर्टी खरेदी केल्याचं समजत आहे. १२०० स्के.फूट परिसरात पसरलेल्या या प्रॉपर्टीची किंमत कोटींच्या घरात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ८.०१ कोटींना सुनील शेट्टी आणि अहानने ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे. यासाठी सुनील शेट्टीने ४०.०८ लाखांची स्टॅम्प ड्युटी आणि जवळपास ३० हजार रुपयांची रेजिस्ट्रेशन फी भरली असल्याची माहिती मिळाली आहे. पण, याबाबत अद्याप सुनील शेट्टीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अहान शेट्टीने देखील अभिनयात करिअर करायचं ठरवलं. 'तडप' या सिनेमातून अहानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण, त्याचा पहिलाच सिनेमा फ्लॉप ठकला.  त्याला बॉलिवूडमध्ये फार चांगली कामगिरी करता आली नाही. या सिनेमानंतर अहान कोणत्याच सिनेमात दिसला नाही. 

टॅग्स :सुनील शेट्टीअहान शेट्टीसेलिब्रिटी