बॉलिवूडचा अण्णा म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टी आज स्टार आहे. तो एक बिझनेसमॅन आहे. त्याच्या कार्यकाळात त्याने जेवढे हिट चित्रपट दिले तेवढेच फ्लॉप चित्रपटही दिले. त्याकाळीही फ्लॉप चित्रपटांचं दु:ख मी पचवू शकलो नाही. रात्रभर रडायचो. अमिताभ बच्चन बनायचे होते, पण बनू शकलो नाही. मात्र, या सर्व फ्लॉप चित्रपटाची जबाबदारी पण तो स्वत: घेतो. त्याने अलीकडेच खुलासा करून शेअर केले.
अलीकडेच एका मुलाखतीत त्याच्या जुन्या आठवणी शेअर करत म्हणाला, ‘मी जेव्हा माझे करिअर सुरू केले, तेव्हा मला पाठिंबा देणारे, मार्गदर्शन करणारे कुणी नव्हते. मी जे काही शिकलो ते माझ्या मार्गात आलेल्या अपयशांवरूनच शिकलो. जेव्हा माझा पहिला चित्रपट हिट झाला होता तेव्हा मी खूप आनंदी झालो होतो. माझे चित्रपट हिट होत असल्यामुळे मला असे वाटू लागले होते की, मी बॉलिवूडचा दुसरा अमिताभ बच्चन होऊ शकतो. पण, हे केवळ एक स्वप्नच राहिले.’
पुढे सुनील शेट्टी म्हणाला,‘मला अनेकांनी सल्ले दिले की, तू चित्रपट सोडून आता हॉटेल इंडस्ट्री जॉईन कर. मला त्याकाळात खूप अपयशी ठरल्यासारखे वाटायचे. तरीही मी स्वत:ला खूप पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचो. मग मी याकडे लक्ष दिले की, चाहत्यांना माझ्याकडून काय अपेक्षित आहे? मग हळूहळू मला अनुभव येऊ लागला. एक वेळ असा होता की, रात्र-रात्र मला झोप येत नसे. माझी रात्र रडूनच पूर्ण व्हायची.’