Join us

पुन्हा एकत्र स्पॉट झाले सनी देओल आणि डिंपल कपाडीया, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 8:01 PM

Sunny Deol And Dimple Kapadia's Controversial Love Story: सनी देओल आणि डिंपल कपाडिया दोघांनी पाच सिनेमात एकत्र काम केले आहे. याच दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली असल्याचे बोलले जाते. दोघांच्या त्यावेळी जोरदार अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

बॉलीवुडमध्ये लिंकअप आणि अफेयरच्या चर्चा काही नव्या नाहीत.. सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेयरच्या चर्चा बी-टाऊनमध्ये गेल्या कित्येकवर्षांपासून सुरु आहेत. दोघंही अनेकदा एकमेंकाना गुपचुप भेटताना आढळलेत. पुन्हा एकदा दोघांनाही एकत्र पाहिले गेले यावेळी दोघांच्या चेह-यावर मास्क लावलेला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.नुकतेच दोघे एकत्र राजकुमार संतोषी यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यावेळी दोघांना एकत्र मीडियाच्या कॅमे-यात कैद केले गेले. सध्या डिंपल कपाडिया आणि सनी देओल दोघांचेही एकत्र असलेले फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

सनी देओल आणि डिंपल कपाडिया  दोघांनी  पाच सिनेमात एकत्र काम केले आहे. याच दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली असल्याचे बोलले जाते. दोघांच्या त्यावेळी जोरदार अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र तरीही दोघांनी लग्न केलं नाही. डिंपल यांनी राजेश खन्नासह लग्न करत संसार थाटला. तर सनी देओलचंही अभिनेत्री रवीना टंडनसोबत जास्त जळीक वाढू लागली होती. लग्नानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरु होत्या.डिंपल काही वर्षे सनी देओलसह राहत असल्याचेही बोलले गेले. सनीने डिंपलला पत्नीचाही दर्जा दिला होता.जेव्हा दोघांचे अफेअर सुरू होते. तेव्हा डिंपलच्या दोन्ही मुली ट्विंकल आणि रिंकी खन्ना सनीला 'छोटे पापा' म्हणायची.

काही वर्षापूर्वी दोघांना एकत्र लंडनमध्ये फिरताना पाहिले गेले होते. यावेळी दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसले होते. लंडनमधला त्यांचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा या कपलच्या लव्हस्टोरीची चर्चा सुरु झाली होती. अधून मधून काही ना काही कारणांमुळे हे कपल चर्चेत येत त्यांच्या प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली देत असतात.

असे सांगितले जाते की,  ११ वर्ष सनी आणि डिंपल यांचे अफेअर सुरु होते. सनी देओलची पत्नी पूजा देओलही या दोघांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे वैतागली होती. शेवटी सनीसह नातं संपवण्याचीही धमकीच पूजाने दिली होती. सनी डिंपलपासून दूर झाला नाही तर दोन्ही मुलांना घेऊन घर सोडून निघून जाईल अशीही धमकी तिने दिली होती.त्यानंतर सनीने त्याचे वैवाहीक आयुष्य वाचवण्यासाठी डिंपलपासून दुरावा स्विकारला. 

टॅग्स :सनी देओलडिम्पल कपाडिया