Join us

सनीने माझ्याच सांगण्यावरुन 'गदर 2' केला, हेमा मालिनींचा खुलासा, म्हणाल्या, "मी नेहमी त्याला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 11:06 IST

हेमा मालिनींनी 'गदर 2' पाहिला. प्रतिक्रिया देत म्हणाल्या, "मला असं वाटलं की मी..."

सनी देओलने (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) मधून बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मात्र त्याने हा सिनेमा चक्क हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या सांगण्यावरुन केला आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. होय, स्वत: हेमा मालिनी यांनी याबाबत खुलासा केला आहे. 'मी सनीला नेहमी सांगायचे की तुला एक बेस्ट फिल्म द्यावीच लागेल' असंही त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या हेमा मालिनी?

सनी देओल हेमा मालिनी यांचा सावत्र मुलगा आहे. त्या दोघांना एकमेकांसोबत फार कमी वेळा पाहण्यात आलंय. तसंच धर्मेंद्र यांची दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात नसतात अशीही चर्चा असायची. पण 'गदर 2'च्या यशानंतर देओल कुटुंबीय प्रसिद्धीझोतात आलंय. सनी देओलच्या यशाचं खरं क्रेडिट हे हेमा मालिनींना जातं. कारण त्यांनीच सनीला हा सिनेमा करण्यास सांगितलं. नुकतंच एका मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या,'सनीचा चाहतावर्ग मोठा आहे. चाहत्यांना त्याला मोठ्या पडद्यावर पाहायचं असतं. मी नेहमी सनीला सांगायचे की तुला बेस्ट फिल्म द्यावीच लागेल. तुला करावंच लागेल. त्यानेही मला वचन दिलं होतं की तो करेल. आणि त्याने करुन दाखवलंच. तो खूप गोड आहे. त्याने माझ्या सांगण्यावरुन हा सिनेमा केला.'

ईशा देओलने सावत्र भावाचं केलं कौतुक, म्हणाली, "गदर 2 साठी भैय्याने...'

'गदर 2'च्या स्पेशल स्क्रीनिंगला हेमा मालिनी गैरहजर राहिल्या. मात्र नंतर त्यांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिला. यानंतर माध्यमांसमोर त्यांनी सिनेमा खूप आवडला असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या, "खूप छान वाटलं. जे अपेक्षित होतं तसंच होतं. असं वाटलं की मी परत ७०-८० च्या दशकात गेली आहे. सनीने यामध्ये कमाल केली आहे. २२ वर्षांनंतरही तारा सिंग आणि सकीनाची जोडी सुंदर दिसत आहे." 

टॅग्स :हेमा मालिनीसनी देओलबॉलिवूड