Join us  

Gadar 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, १० व्या दिवशी केली ओपनिंग डे इतकीच कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 9:18 AM

२००१ साली ज्याप्रकारे 'गदर'ने इतिहास घडवला होता. अगदी तसाच प्रतिसाद 'गदर' च्या सिक्वलला मिळताना दिसतोय.

बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2'चा (Gadar 2) बॉक्सऑफिसवरील धुमाकूळ अजूनही सुरुच आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने १० दिवशीही तुफान कमाई केली आहे. एखाद्या सिनेमाने १० व्या दिवशी ओपनिंग डे इतकीच कमाई करणं यावरुनच आपण सिनेमाच्या यशाचा अंदाज लावू शकतो. २००१ साली ज्याप्रकारे 'गदर'ने इतिहास घडवला होता. अगदी तसाच प्रतिसाद 'गदर' च्या सिक्वलला मिळताना दिसतोय.

'गदर'ची कमाई किती?

११ ऑगस्ट रोजी 'गदर 2' रिलीज झाला. सध्या हा फक्त एक सिनेमा प्रदर्शित झाला नसून प्रेक्षकांसाठी एखदा सणच असल्यासारखं वातावरण तयार झालंय. ज्याप्रकारे 'गदर'ची क्रेझ दिसून येतेय हे खरोखर अद्भूत आहे. पहिल्याच दिवशी गदरने ४१.१ कोटींची भरघोस कमाई केली होती. मात्र पहिल्या आणि १० व्या दिवशीची खरंतर तुलना होऊ शकत नाही कारण कमाई हळूहळू कमी होत असते. पण गदरबाबतीत असं झालेलं नाही. 'गदर 2' ने काल रविवारी दहाव्या दिवशी 41 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर आतापर्यंत सिनेमाने 377.20 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

पहिल्या दिवशी 40.1 कोटीदुसऱ्या दिवशी 43.08 कोटी तिसऱ्या दिवशी 51.7 कोटीचौथ्या दिवशी 38.7 कोटी पाचव्या दिवशी 55.4 कोटीसहाव्या दिवशी 32.37 कोटीसातव्या दिवशी 23.28 कोटी एका आठवड्याचे एकूण कलेक्शन 284.63 कोटीआठव्या दिवशी 20.5 कोटीनवव्या दिवशी 31.07 कोटीदहाव्या दिवशी 41 कोटी

'गदर 2' चा धुमाकूळ बघता इतक्यात तरी बॉक्सऑफिसचे आकडे कमी होतील असं वाटत नाही. 'गदर 2' हिट होण्याचं कारण म्हणजे हा सिनेमा फक्त सिनेमा नाही तर लोकांसाठी ते एक इमोशन आहे. तसंच मेकर्सने जून महिन्यात 'गदर एक प्रेम कथा' पुन्हा थिएटर्समध्ये रिलीज केला होता. याचाही सिनेमाला फायदा झाला. सध्या प्रेक्षकांमध्ये केवळ सनी पाजीची क्रेझ दिसून येतेय. 

टॅग्स :सनी देओलबॉलिवूडअमिषा पटेलसिनेमा