Join us

"गदर २मध्ये माझी गाणी वापरण्यासाठी मला विचारलंच नाही", प्रसिद्ध संगीतकाराचे दिग्दर्शकावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 5:10 PM

Gadar 2 : सनी देओलचा 'गदर २' वादात, 'उड जा काले कव्वे'च्या संगीतकाराचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप

सनी देओलचा 'गदर २' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तारा सिंह आणि सकिनाची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना भावली होती. याबरोबरच गदर मधील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 'उड जा काले कव्वे' आणि 'मै निकला गड्डी लेके' या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. तब्बल २२ वर्षांनंतर आलेल्या या चित्रपटाच्या सीक्वेलमध्येही ही गाणी असल्याने प्रेक्षकांना सुखद धक्का मिळाला होता.

पण, 'गदर २' मधील या गाण्यांवरुन आता वाद निर्माण झाला आहे. 'उड जा काले कव्वे' आणि 'मै निकला गड्डी लेके' गाण्याचे संगीतकार उत्तम सिंह यांनी गदरच्या दिग्दर्शकांवर आरोप केला आहे. 'गदर २' चित्रपटात त्यांची गाणी वापरण्यासाठी विचारणा झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत उत्तम सिंह म्हणाले, "गदर २साठी मला विचारणा झाली नाही. मला न विचारताच त्यांनी माझी गाणी आणि म्युझिक चित्रपटात वापरलं आहे. मला कोणाकडे काम मागायची सवय नाही. त्यामुळे मी 'गदर २'च्या दिग्दर्शकाबरोबर बोललो नाही."

"२०१६ मध्ये मालिका संपली पण...", 'का रे दुरावा'च्या आठवणीत सुयश टिळकची भावुक पोस्ट

उत्तम सिंह गेल्या सहा दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. 'दिल तो पागल है' हे शाहरुख खानच्या चित्रपटातील गाणंही त्यांनीच संगतीबद्ध केलं आहे. 'गदर २'साठी विचारणा झाली नाही त्यामुळे त्यांच्या करिअरवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही, असंही ते म्हणाले. पण, चित्रपटात गाणी वापरण्यासाठी दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी एकदा फोन करुन विचारायला हवं होतं. 'गदर २'मध्ये त्यांची दोन गाणी वापरण्यात आली आणि तीच दोन गाणी ट्रेंडिंगमध्ये असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. 

"तुझा नवरा कुठे आहे?" चाहत्याच्या प्रश्नाला मानसी नाईकने दिलं उत्तर, म्हणाली...

दरम्यान, 'गदर २' चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्डब्रेक कमाई करायला सुरुवात केली होती.  अवघ्या सात दिवसांतच या चित्रपटाने २८३ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता 'गदर २' ३०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच सामील होणार आहे.

टॅग्स :सनी देओलअमिषा पटेलबॉलिवूड