अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या 'गदर 2' (Gadar 2) चं यश एन्जॉय करतोय. बऱ्याच वर्षांनी सनी पाजीने पुन्हा बॉक्सऑफिस गाजवलंय. त्याचं यश पाहून 'गदर एक प्रेम कथा', 'घातक', 'घायल', 'डर' या त्याच्या सुपरहिट सिनेमांचा काळ आठवतो. आता सनी देओल पुन्हा अभिनयात सक्रिय होणार असल्याचं चित्र आहे. खूप यश मिळालं की ते कलाकारांच्या डोक्यात जातं असं म्हणतात. सनी देओल नुकताच एका चाहत्यावर भडकल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे सनी देओललाही माज आल्याचं नेटकऱ्यांनी बोलायला सुरुवात केली. आपल्या त्या कृत्यावर सनी देओलने आता स्पष्टीकरण दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी सनी देओलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. विमानतळामधून बाहेर येताना एक चाहता त्याला सेल्फीसाठी विनंती करतो. तेव्हा त्याचे सुरक्षारक्षक चाहत्याला बाजूला करत असतात. पण सनी थांबतो. तरी तो चाहता वेळा लावतो त्यामुळे अभिनेता त्याच्यावर भडकल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यानंतर सनीला प्रचंड ट्रोल केले गेले. या प्रकरणावर सनी देओलने स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाला सनी देओल?
रणवीर अलाहाबादियावालाला दिलेल्या मुलाखतीत सनी देओल म्हणाला,'काय होतं ना...सध्या माझी खूप धावपळ होत आहे. माझीही तब्येत खराब होते. कितीदा मी थकतो, दुखत असतं तरी मी चालत राहतो. चाहत्यांचं प्रेम असतं म्हणून ते येतात आणि फोटो काढून झाला तरी ते बाजूला होत नाही. तेव्हा मी हे नाही पाहत की कोणी मला रेकॉर्ड करतंय की नाही. माझी ती झटपट आलेली रिअॅक्शन आहे. त्यांनीही समजून घेतलं पाहिजे की आम्ही पुढे जातोय जाऊ द्यावं. आज जर तो मला पुन्हा भेटला तर मी त्याला मिठी मारेल कारण ती फक्त तेव्हाची प्रतिक्रिया होती.'
सनी पाजी हा चाहत्यांच्या फारच जवळ आहे. तो मनाने किती साफ आहे हे देखील त्याच्या मुलाखतीतून समजतं. 'गदर 2'ने आतापर्यंत 474.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. काल रक्षाबंधनाच्या दिवशी सिनेमाने ८ कोटींचा गल्ला जमवला. लवकरच चित्रपट ५०० कोटींचा टप्पाही पार करेल असं चित्र आहे.