Join us

म्हणून मुलाला लाँच करताना सनी देओल झाला होता नर्व्हस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 6:00 AM

सनी देओलने बेताब सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बेताब सिनेमानंतर सनी देओल हे नाव घराघरात पोहोचले. यानंतर त्यांने कधीच मागे वळून पाहिले नाही.

गीतांजली आंब्रे 

सनी देओलने बेताब सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बेताब सिनेमानंतर सनी देओल हे नाव घराघरात पोहोचले. यानंतर त्यांने कधीच मागे वळून पाहिले नाही. दामिनी, घायल, गदर, डर, बॉर्डर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आता देओल कुटुंबातून आणखी एक नाव चेहरा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल 'पल पल दिल के पास' सिनेमातून डेब्यू करतोय. या सिनेमाचे दिग्दर्शन सनी देओल करतो आहे. दिग्दर्शक म्हणून सनी देओलाचा हा तिसरा सिनेमा आहे.  या सिनेमाच्या निमित्ताने सनी देओल याच्याशी साधलेला हा खास संवादतुझा मुलगा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय, वडील म्हणून तू किती एक्सायडेट आणि नर्व्हस आहे ?मला आता कळतंय की जेव्हा माझा पहिला सिनेमा बेताब रिलीज झाला त्यावेळी माझे वडील(धर्मेंद्र) किती नर्व्हस  झाले असतील कारण मी आता त्याच वळणावर आहे. 'पल पल दिल के पास'चा टीझर आऊट झाल्यावर माझा नर्व्हसने थोडा कमी झाला ज्यावेळी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.    

 

करण जेव्हा पहिल्यांदा तुला सांगितले त्याला अभिनेता बनायचं आहे त्यावेळी तुझी पहिली रिअॅक्शन काय होती ?माझी प्रतिक्रिया हीच होती की तुला नक्की अभिनेता बनायचं आहे. या मागे अनेक कारण होती. हे प्रोफेशन असे आहे की इथं तुम्हाला सारखी संधी मिळणार नाही. तुला येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोऱ्या जावचं लागणार. तुला स्वत:मधला अभिनय शोधायला हवा. तुला कामाशी नेहमी प्रामाणिक राहायला हवं. डान्स शिकलास, बॉडी बनवलीस म्हणजे तू हिरो झाला नाही. तला प्रत्येक भूमिका प्रामाणिकपणे साकारता आली पाहिजे कारण आम्ही पण त्याच अभिनयाच्या शाळेतून आलो आहे. माझी इच्छा आहे माझ्या मुलांनेदेखील त्याच अभिनयाच्या शाळेतून यावं.

 बेताब सिनेमातून 35 वर्षांपूर्वी तू बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केलीस, 35 वर्षांमध्ये सिनेमा किती बदलला आहे ?गेल्या 35 वर्षात संपूर्ण देश बदलला आहे.  प्रत्येक गोष्ट बदलली आहे त्यामुळे इंडस्ट्रीदेखील बदलली आहे. त्यावेळेसाठी ती इंडस्ट्री खूप पुढे होती. आज आपल्याला माहित नाही उद्या काय होणार पण आजसाठी आपण खूप पुढे आहोत. त्यामुळे मला वाटते तुलना न केलेली जास्त बरं आहे. पुढच्या पाच वर्षांत अजून बरेच काही बदलेले असेल. त्यामुळे वेळेनुसार गोष्टी बदलत जातात.

गेल्या अनेक वर्षे तू इंडस्ट्रीत असून सुद्धा तू नेहमीच तू माणूस म्हणून साधाच राहिलासं ?माझा स्वभाव तसा आहे. मी खूप खुश आहे माझ्या आयुष्यात, माझं माझ्यावर कामावर प्रेम आहे. तुमचे सिनेमा चालला तर तुम्ही स्टार बनतात. माझं सिनेमा माझ्या अभिनयामुळे चालले जास्त आवडतात. सध्या सिनेमांसाठी प्रमोशन केले जातात. त्यात काही चुकीचं आहे असे सुद्धा नाही. पण तुमचं काम बोलले पाहिजे या मताचा मी आहे.

 

टॅग्स :सनी देओल