अभिनेता सनी देओलची (Sunny Deol) दोन्ही मुलं करण (Karan Deol) आणि राजवीर (Rajveer Deol) प्रसिद्धीझोतात आली आहेत. छोटा मुलगा राजवीर बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान त्याने नेपोटिझमवर आपलं मत व्यक्त केलं. नेपोटिझमच्या वादाने मला एक चांगला अभिनेता आणि माणूस बनण्यास मदत केल्याचं तो म्हणाला.. तसंच स्टारकीड असल्याचा नेमका काय फायदा होता यावरही त्याने भाष्य केलं.
राजवीर देओल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पूनम ढिल्लो यांची मुलगी पलोमा राजवीरसोबत डेब्यू करत आहे. त्यांचा 'दोनो' हा सिनेमा येत आहे. सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश बडजात्या पहिल्यांदाच या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे.दरम्यान नेपोटिझम वादावर राजवीर म्हणाला,' मी यावर कधी विचारच केला नाही असं खोटं मी बोलणार नाही. मला वाटतं या वादाने मला आणखी जास्त चांगला अभिनेता आणि माणूस बनवलं आहे. स्टारकीड असण्याचा फायदा असा होतो की तुम्ही एक मीटिंग शेड्युल करता. पण त्यानंतर काम मिळण्याची काहीच गॅरंटी नसते. या सिनेमातील भूमिकेसाठी मी तीन ऑडिशन दिले.'
आपल्या भूमिकेविषयी राजवीर म्हणाला,'सिनेमाच्या शूटआधी मी अनेक वर्कशॉप केले. आम्ही आमच्या केमिस्ट्रीला पडद्यावर दाखवण्यासाठी खूप तयारी केली. सुरुवातीला हे अजिबातच सोपं नव्हतं पण मी खूप फोकस होतो आणि पालोमा आणि मी एकमेकांना सपोर्ट करायचो.'
फिल्म 'दोनो' मॉडर्न नात्यावर आधारित आहे. राजवीर आणि पालोमाची ही पहिलीच फिल्म आहे. तर दिग्दर्शक अवनीश बडजात्याचाही दिग्दर्शनाचा पहिलाच अनुभव आहे. ५ ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित होतोय.