बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सनी देओल आता राजकारणाच्या आखाड्यात उतरला आहे. सनी देओल धर्मेन्द्र यांचा मुलगा आहे, हे आपण सगळेच जाणतात. पण सनी देओलची पत्नी आणि मुले यांच्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. सनी देओल अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. पण पत्नी पूजा देओल हिचा फोटो मात्र चुकूनही त्याच्या सोशल अकाऊंटवर दिसत नाही. पण आता पहिल्यांदा सनी देओलची पत्नी आणि धर्मेन्द्र यांची मोठी सून पूजा देओलचा फोटो समोर आला आहे. सनीचा मुलगा करण याने आईचा फोटो शेअर केला आहे.सनी व पूजा यांना करण व राजवीर अशी दोन मुले आहेत. करण लवकरच बॉलिवूड डेब्यू करतोय.
खरे पाहता, सनीचे आयुष्य म्हणजे, ‘खुली किताब’ आहे. पण पर्सनल लाईफबद्दल तो फार कमी बोलतो. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधीच सनीने पूजासोबत लग्न केले होते. हे साल होते १९८४. पण सनी आणि पूजा यांचे लग्न अनेक वर्षे जगापासून लपवून ठेवण्यात आले होते. पुढे सनीच्या लग्नाचे फोटो युकेच्या एका मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेत आणि या लग्नाबद्दल जगाला कळले. अर्थात यानंतरही आजपर्यंत कधीच सनी व पूजा यांना पब्लिकली एकत्र पाहिले गेले नाही.
सनीचे लग्न झाले असूनही तो अमृता सिंगच्या प्रेमात पडला होता. अभिनेत्री अमृताचे सनीवर खूप प्रेम होते. पण सनी मात्र पूर्ण जगासमोर हे नाते मान्य करण्यास तयार नव्हता. याचदरम्यान अमृताने सनीची बाहेरून चौकशी करण्यास सुरूवात केली आणि सनीचे लंडनमध्ये राहणा-या पूजा नावाच्या मुलीसोबत अफेअर असल्याचे तिला कळले. अर्थात अमृता सनीच्या प्रेमात इतकी वेडी होती. सुरूवातीला सनी व पूजाच्या नात्यांवर ती विश्वास ठेवायला तयार नव्हती.
सनी कामाच्या निमित्ताने नेहमी लंडनला जात असे. एवढेच अमृताला माहित होते. पण पुढे सनी व पूजाचे केवळ अफेअर नाही तर दोघांचेही लग्न झाले आहे, हे अमृताला कळले. सनीने लग्नाची गोष्ट अख्ख्या जगापासून लपवून ठेवली होती. पण एक ना एक दिवस सत्य बाहेर येतेच. अखेर सनीच्या लग्नाची बातमी पेपरमध्ये झळकली. पण तरीही सनी लग्न झाले ही गोष्ट मान्य करण्यास तयार नव्हता. अर्थात तोपर्यंत सनी आणि अमृता यांचे नाते संपुष्टात आले होते.
यानंतर सनीच्या आयुष्यात आली ती डिम्पल कपाडिया. दोघांनीही अनेक हिट चित्रपट दिलेत. १९८४ मध्ये ‘मंजिल-मंजिल’ या चित्रपटात ही जोडी झळकली. ती इतकी हिट झाली की, या जोडीला साईन करण्यासाठी दिग्दर्शकांमध्ये जणू स्पर्धा लागली. त्यामुळे अर्जुन, आग का गोला, नरसिम्हा, गुनाह अशा अनेक चित्रपटात सा जोडीने एकत्र काम केले. चित्रपटात एकमेकांसोबत रोमान्स करता करता ही जोडी रिअल लाईफमध्येही रोमान्स करू लागली. सनी देओल विवाहित होता. पण तोही डिम्पलच्या प्रेमात पडला होता. त्याकाळात डिम्पल राजेश खन्ना यांच्यापासून वेगळी राहत होती. सनी व डिम्पलची प्रेमकहाणी तब्बल ११ वर्षे चालली. या दोघांनी गुपचूप लग्न केले, अशाही बातम्या त्यावेळी आल्यात. अर्थात सनी व डिम्पल यांनी कधीही हे मान्य केले नाही.