Join us  

'गदर 2' सुपरहिट झाल्यानंतरही सनी देओलने साईने केलेला नाही एकही सिनेमा, जाणून घ्या यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 12:39 PM

अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने यावर्षी बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला.

अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने यावर्षी बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला. 'गदर २' त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिकचा बिझनेस केला आहे. या चित्रपटानंतर  सनीकडून चाहत्यांच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत. आता त्यांच्या नजरा त्याच्या पुढील चित्रपटाकडा लागल्या आहेत.

गदर 2 च्या यशानंतर सनी देओलच्या पुढील चित्रपटाबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. या अभिनेत्याने चित्रपट साइन केल्याची जोरदार चर्चाही रंगली आहे. यात घायाळ, घटक आणि दामिनी या चित्रपटांनंतर तो पुन्हा एकदा राजकुमार संतोषी यांच्यासोबत काम करणार आहे.  पण यात तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. सनी देओलने 'गदर 2' नंतर कोणताही नवीन चित्रपट साईन केला नसल्याचे वृत्त आहे. यामागे कारण आहे हेही समोर आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनी देओलने गदर 2 नंतर कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. तो सध्या वैयक्तिक कारणांमुळे ब्रेकवर आहे. आई-वडिलांसोबत तो सध्या अमेरिकेत आहे. आतापर्यंत त्याने कोणत्याही प्रोजेक्टचा भाग होण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्याला आता ज्या प्रोजेक्ट्समध्ये काम करायचे आहे त्याबद्दल त्याला कोणतीही घाई नाही.

काही रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जात आहे की, सनी देओल पुन्हा एकदा गदर 2 चे दिग्दर्शक अनिल शर्मासोबत काम करणार आहे, पण यातही काही तथ्य नाही. वृत्तानुसार, अमेरिकेतून परतल्यानंतर सनी देओल स्क्रिप्ट वाचण्यास सुरुवात करेल, त्यानंतरच तो पुढील चित्रपटाबाबत निर्णय घेईल.

टॅग्स :सनी देओल