Join us

अ‍ॅक्टिंग नाही तर रॅपमुळे चर्चेत आला सनी देओलचा मुलगा करण देओल, पहा त्याचा हा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 16:46 IST

अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देसनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. करणचा हा व्हिडिओ त्याचा बेस्ट फ्रेंड यश डोंगरेच्या लग्नावेळी शूट केलेला आहे. 

यश डोंगरे प्रसिद्ध फॅशन डिझायनर अंकिता डोंगरेचा मुलगा आहे. यश डोंगरेच्या लग्नात करण रॅप करताना दिसतो आहे. या रॅपला तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला प्रोत्साहन दिले. हा व्हिडिओ करणने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करीत म्हटले की, तू एक नवीन प्रवासाला सुरूवात करणार आहेस. माझ्याकडे शुभेच्छा देण्याव्यतिरिक्त काही नाही. या रॅपच्या माध्यमातून मला तुला सन्मानित करायचे आहे.

करणने शेअर केलेल्या व्हिडिओत तो डॅशिंग लूकमध्ये दिसतो आहे. त्याच्या या व्हिडिओला खूप पसंती मिळते आहे. त्याच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचे तर करण लवकरच पल पल दिल के पास या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटातील त्याचा लूक व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता.

या पोस्टरमध्ये त्याच्यासोबत सहकलाकार सहर बाम्बा दिसत आहे. हा चित्रपट १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओलने केले आहे. 

टॅग्स :सनी देओल